Crime News : अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये नेऊन माजी सरपंचाने केला बलात्कार!

Crime News : व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमुळे संतोष आणि पिडीतामध्ये ओळख वाढत गेली.
Crime
CrimeSarkarnama

पुरंदर : पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी सरपंच असलेल्या संतोष नाझिरकर याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. संबंधित मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर संतोषने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पिडीत मुलीने आपल्याबाबत होत असलेली घटनांबाबतची कल्पना आपल्या आईला दिली. येथील लोकेशनही फोनवर पाठवून दिलं. यानंतर मुलीची आई व पोलिस लोकेशनवर दाखल झाले. या नंतर पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली.

संतोषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची दखल घेत पोस्को कायदा अन्वये आता गुन्हा दाखल झाला आहे. माजी सरपंच असलेल्या संतोष नाझिरकरला (वय ४० रा. पुरंदर तालुका) अटक झाली आहे. पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, संतोष नाझिरकर आणि पीडित अल्ववयीन मुलगी यांच्यात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती.

Crime
पालिका निवडणूक आल्याने भाजप शहराध्यक्ष आ. लांडगेंना लघुउद्योजकांचा पुळका`

व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमुळे संतोष आणि पिडीतामध्ये ओळख वाढत गेली. आपण जेवायला जाऊ असे म्हणून संतोषने पीडित मुलीला कात्रज येथील एका लॉजवर नेले. या दरम्यान संतोषने तिच्यावर बलात्कार केला. पीडिताने मुलीने रूमच्या बाथरूममध्ये जाऊन आईला फोन केला. लॉजचे लोकेशन पाठवले.

Crime
Laxman Jagtap : आयुक्तसाहेब सावध व्हा, गोवर आयसोलेशन कक्ष सुरू करा : आमदार जगतापांची मागणी!

यानंतर आई घडल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देत, तात्काळ संबंधित ठिकाणी पोहचली. यावेळी संतोष नाझीरकरला संबंधित मुलीवर बलात्कार करत असतानाच पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यानंतर संतोषला अटक करून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in