Crime News : पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरटांसह पोलिसांवर होणार पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Shrihari Bahirat : श्रीहरी बहिरट हे सध्या पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सिनिअर पीआय आहेत
Crime, Shrihari bahirat
Crime, Shrihari bahiratSarkarnama

Pimpri Chinchwad News: राहुरी येथील डॉ.विजय मकासरे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी दाखल केलेला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच रद्द केला. त्यामुळे आता हे डॉक्टर हा गुन्हा दाखल करणारे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन`पीआय` श्रीहरी बहिरट आणि इतर पोलिसांविरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

श्रीहरी बहिरट (Shrihari Bahirat) हे सध्या पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सिनिअर पीआय आहेत. त्यांच्यासह इतर चौघांविरुद्ध येत्या आठ दिवसांत पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानभरपाईचा खटला दाखल करणार असल्याचे डॉ.मकासरे यांनी `सरकारनामा`ला आज सांगितले.

तर, उच्च न्यायालयाच्या निर्णय़ावर आपले म्हणणे न्यायालयाला सादर करू,असे बहिरट म्हणाले.डॉ.मकासरेंविरुद्ध श्रीरामपूर पोलीस (POLICE) ठाण्यात एक फसवणुकीचा तर सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन व इतर पोलिस ठाण्यात मिळून पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली.

Crime, Shrihari bahirat
Pune News : शिवतारे,आढळरावांना शिंदे गटाकडून मिळाले पहिले गिफ्ट;जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

डॉ.मकासरेंच्या म्हणण्यानुसार, श्रीरामपूर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने त्यात डॉ.मकासरेंचा सबंध नसल्याचे न्यायालयात शपथपत्रावर सांगितले.त्यामुळे सदर गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले असता त्यासाठी त्यांच्याकडे लाच मागण्यात आली.म्हणून त्यांनी त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार दिली.

Crime, Shrihari bahirat
Thackeray Vs Shinde : मोठी बातमी : शिंदे गटाच्या सात जिल्हाप्रमुखांवर ठाकरेंचा आक्षेप ; आयोगावर समोर केला दावा!

त्यानुसार १० जुलै २०१९ रोजी एसीबीने श्रीरामपूर पोलिस ठाण्याबाहेर सापळा लावला होता. मात्र त्याची चाहूल लागल्याने सबंधित पोलिस लाच घेण्यासाठी आलाच नाही.उलट रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणला म्हणून एसीबी पथक असलेली डॉ.मकासरेंची मोटार पोलिसांनी ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र, डॉ.मकासरेंनी मोटार एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेलापूर रोडला नेली.हा सर्व प्रकार रिचर्ड गायकवाड यांनी बहिरट यांना फोनवरून सांगत बेलापूर रोडला येण्यास सांगितले.

बहिरट आणि किशोर जाधव या पोलिसाने खासगी मोटारीने डॉ. मकासरेंच्या मोटारीचा पाठलाग केला.त्यांनी डॉ. मकासरेंच्या गाडीला आपली गाडी आडवी लावली.त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सांगण्यावरुन हा प्रकार झाला असून डॉ. मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करु नका असे सांगितले.तरीही त्यांनी तो नोंदविला होता. त्याविरोधात डॉ.मकासरेंनी अॅड.दत्तात्रेय मरकड यांच्यामार्फत आपल्याविरुद्धचा खोटा गुन्हा रद्द व्हावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com