Sushma Andhare News : शिरसाटांना न्यायालयाचा दणका; अंधारे अब्रुनुकसान प्रकरणी दिले 'हे' आदेश

Court Summons Sanjay Shirsat : उत्तर न दिल्याने न्यायालयाने बजावले समन्स
Sanjay Shirsat, Sushma Andhare
Sanjay Shirsat, Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare vs Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. यासह अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या प्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यात त्यांना १३ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Marathi Latest News)

Sanjay Shirsat, Sushma Andhare
Ahmednagar News : राज्यात जातीय, धर्मांध शक्तींचा उच्छाद; आंबेडकरी संघटनांचा राज्य सरकारवर निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच शिरसाट यांच्याविरूद्ध अंधारे यांनी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दावाही दाखल केला आहे. या दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरसाट यांच्या विरोधात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी समन्स बजावले आहे. त्यात शिरसाट यांना 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 'क्लिनचिट' दिली आहे. (Pune News)

Sanjay Shirsat, Sushma Andhare
Assembly Election 2023 : दोन राज्यातील विजयानंतर निवडणुकीची कमान आता प्रियंका गांधींच्या खांद्यावर ; महिलांसाठी विशेष..

आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसट यांनी केलेल्या कथित विधानाबाबत अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अंधारे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.

Sanjay Shirsat, Sushma Andhare
Uddhav Thackeray Bihar tour : नितीशकुमारांच्या मातोश्री भेटीनंतर उद्धव ठाकरे बिहारच्या राजधानीत; विरोधक एकत्र येणार?

काय म्हणाले होते शिरसाट ?

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट यांनी आक्षपार्ह्य वक्तव्य केले होते. शिरसाट म्हणाले होते की, "ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तारभाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरेभाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली, हे तिलाच माहीत.” या वक्तव्य विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com