हर्षवर्धन पाटील ब्रीच कँडीत दाखल

त्यांचे आवश्यक विविध वैद्यकीय तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत.
Harshvardhan Patil

Harshvardhan Patil

sarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून थकवा जाणवू लागल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Corona positive Harshvardhan Patil admitted to Breach Candy Hospital)

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह २८ डिसेंबर रोजी निहार ठाकरे यांच्याशी मुंबईत झाला होता. त्यानंतर पाटील यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यानंतर थकवा जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आवश्यक विविध वैद्यकीय तपासण्यांचे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पाटील यांची तब्येत उत्तम आहे. थोडाफार थकवा जाणवत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

Harshvardhan Patil

माजी नगरसेवकाला ‘हनीट्रॅप’मध्ये ओढण्याचा ‘नर्स’चा प्रयत्न पोलिसांनी उधळला

दरम्यान, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असतानादेखील त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू आहे. त्यांच्या संस्थांचे कामकाज तसेच दैनंदिन कामकाजामध्ये खंड पडलेला नाही. सतत कामांमध्ये व्यस्त राहण्याच्या स्वभावामुळे आजारी असूनही पाटील हे व्हॉट्स ॲप तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी, जनतेशी संपर्कात आहेत. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Harshvardhan Patil

सर्व २७ जागा राष्ट्रवादीला जिंकून देतो; वडगाव शेरीला महापौरपद द्या : टिंगरेंनी मागितला शब्द

ओमिक्रॉनची संख्या राज्यात वेगाने वाढत आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या ५ मंत्री आणि काही आमदार कोरोनाबाधित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करायला आलेल्या अजित पवार यांनी राज्यातील राजकीय मंडळींना कोरोना झाल्याची माहिती दिली.

Harshvardhan Patil

सिंधुदुर्गात साताऱ्याची पुनरावृत्ती : अजित पवारांचे ते विधान खरे ठरले!

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आदी मंत्र्यांना कोरोना झाला आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील या प्रमुख नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com