पुणे जिल्ह्यातील १०७ गावांची कोरोनाची चिंता वाढली

या गावांमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.
corona 2.jpg
corona 2.jpg

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ( pune and pimpri chinchwad city) कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना स्थिती अद्यापही बिकटच असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या गावांची चिंता वाढली आहे. या गावांमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.(Corona concerns 107 villages in Pune district)

दरम्यान, या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करून त्या अधिक कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषदेने या गावांमधील गाव कारभारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (ता.९) बोलाविली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्मयातून ही बैठक घेतली जाणार आहे. नव्याने कोरोना रुग्ण वाढत असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक २१ गावे ही जुन्नर तालुक्यातील असून, सर्वात कमी केवळ दोन गावे ही वेल्हे तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेल्हे तालुका पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक हॉट स्पॉट बनला होता. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीपासून ओसरण्यास सुरवात झाली. जून महिन्याच्या मध्यापर्यंत या दोन्ही शहरातील दुसरी लाट पुर्णपणे नियंत्रणात आली. परंतू याला पुणे जिल्ह्याचा ग्रामीण

भाग अपवाद ठरू लागला आहे. या दोन्ही शहरांच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रोजच्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या कायम जास्त राहू लागली आहे. ग्रामीण भागातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे पाहून, जिल्हा परिषदेने एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मे आणि जून महिन्यातील गावनिहाय नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केला. या अभ्यासातून ही बाब उघडकीस आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

रुग्ण वाढणाऱ्या तालुकानिहाय गावांची संख्या
 आंबेगाव - ८, बारामती - ११, भोर - ५, जुन्नर -२१, खेड-१३, मावळ -११,
मुळशी -७, पुरंदर -११, दौंड- ६, हवेली -१२, वेल्हे -०२.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com