पोलिस भरतीत काॅपीचा असाही प्रकार : मास्कमध्ये लपविले इलेक्टाॅनिक डिव्हाईस

मास्क जड वाटल्याने पोलिसांना (Pimpri Police) संशय आला. त्यातून हा आधुनिक कॉपीचा प्रकार उघड झाला.
पोलिस भरतीत काॅपीचा असाही प्रकार : मास्कमध्ये लपविले इलेक्टाॅनिक डिव्हाईस
Police Recruitment ExamSarkarnama

पिंपरी : सध्या राज्यभर पोलिस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) ७२० जागांसाठी आज (ता.१९ नोव्हेंबर) लेखी परीक्षा झाली. या परिक्षेत मास्क मोबाईलव्दारे कॉपी करण्याचा एका परीक्षार्थी तरुणाचा प्रयत्न दक्ष पोलिसांमुळे हिंजवडीमध्ये (ता.मुळशी,जि.पुणे) फसला. मास्कमध्ये दडविलेल्या या डिव्हाईसमधून तो कॉपी करणार होता. पण, तपासणीत या तरुणाचा मास्क खूपच जड वाटल्याने पोलिसांना संशय आला. त्यातून हा आधुनिक कॉपीचा प्रकार उघड झाला आहे.

दरम्यान, ओळखपत्र राहिले अशी सबब सांगून सदर परीक्षार्थी पसार झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध कॉपी केल्याचा गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Police Recruitment Exam
एसटीची कारवाई सुरूच : 238 जणांची सेवा समाप्त; तर 297 निलंबित

पिंपरी-चिंचवडमधील ७२० पोलिस शिपायांच्या जागांसाठी राज्यभरातील तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ जणांनी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या शहरातील ४४४ केद्रांवर शंभर गुणांची लेखी परिक्षा शुक्रवारी दुपारी 3 ते 4:30 या वेळेत झाली. त्यासाठी तब्बल १२ हजार ६९६ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त,१५ एसीपी, तेवढेच पोलिस निरीक्षक आणि १७७ उपनिरीक्षक तथा फौजदारांचा समावेश होता.

Police Recruitment Exam
कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले : पिंपरी-चिंचवड पालिकेवर आरोपांच्या फैरी

या परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून परीक्षार्थींना हाफ बाह्यांचे शर्ट घालण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तसेच, त्यांच्या चपला, बूटं परीक्षा खोलीबाहेरच काढून घेण्यात आली. मोबाईल, ब्लू टूथ, स्मार्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केद्रांत नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. फक्त कोरोनामुळे मास्क बंधनकारक होता. त्याचाच गैरफायदा एका परीक्षार्थीने घेतला. त्याने मास्कमध्ये इलेक्ट्राॅनिक बॅटरी मोबाईल सीमकार्ड बसवले. त्याव्दारे प्रश्नपत्रिका स्कॅन होऊन बाहेर इच्छित स्थळी दिसणार होती. तेथून या कॉपीबहाद्दराला उत्तरे पुरविण्यात येणार होती. अशा जय्यत तयारीनिशी हा तरुण हिंजवडीतील ब्लू रिज पब्लिक स्कूल या परीक्षा केंद्रावर आला होता.

पिंपरी-चिंचवडमधील १ हजार २८८ परीक्षार्थी या केंद्रावर होते. मात्र, या कॉपीबहाद्दराचा बेत फसला. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच्या तपासणीत त्याचा बनाव उघड झाला. मात्र, प्रसंगावधान राखत हॉल तिकिट तथा परीक्षेचे ओळखपत्र विसरल्याचे दुसरा बनाव त्याने केला. तो, मात्र यशस्वी झाला. आयडी आणण्यासाठीचे कारण सांगून गेला आणि तो परतलाच नाही. मात्र, त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे स्थानिक हिंजवडी पोलिस ठाण्याचे प्रमुख सावंत यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in