Pune Congress : पुणे काँग्रेसमधला वाद; शहराध्यक्षानाच संघटनेच्या कामाची माहिती नसल्याचा आरोप

अरविंद शिंदे यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या विरोधातील गट सक्रीय झाला.
Pune Congress
Pune Congress

Pune Congress Politics: पुणे काँग्रेसमधील (Congress) गटबाजी संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. राजकीय व कोरोना काळातील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या शहर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याचा आरोप महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी यांनी केला आहे.

अरविंद शिंदे यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या विरोधातील गट सक्रीय झाला. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने काँग्रेसमधील कुरघोड्या वाढल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितेशकुमार यांची पोलिस आयुक्तपदी निवड झाल्यानंतर लगेचच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी त्यांची भेट घेतली होती. सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे कोरोना काळात सामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

Pune Congress
Chitra Wagh- Urfi Javed Dispute : चित्रा वाघ- उर्फी जावेद वाद पेटला; उर्फी उचलणार मोठं पाऊल

अरविंद शिंदे यांनी पोलिस (Police) आयुक्तांना पत्र पाठवून या मागणीला विरोध केला आहे. संघटितपणे केलेले गुन्हे राजकीय म्हणून मागे घेऊ नयेत, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. त्याचवेळी पक्षाच्याच प्रदेश उपाध्यक्षांच्या मागणीवरही आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने याआधी दिलेले पत्र ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर शहराध्यक्षांच्या स्वाक्षरीने दिलेली भूमिकाच अधिकृत समजावी, असही शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाजप युवा मोर्च्याने कॉंग्रेस भवनावर मोर्चा काढत भवनातील वाहनांचे नुकसान केले होते. शिंदे यांच्या या मागणीला हाच संदर्भ होता. इतकेच नव्हे तर, जर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या मागणीवरुन पोलिसांनी काँग्रेस भवनावरील हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com