भाववाढीवर ओरडणाऱ्यांना लाज वाटायला हवी; गोविंददेवगिरी महाराजांचे अजब व्यक्तव्य

भाववाढीवरुन गोविंददेवगिरी महाराजांनी (Govinddevgiri Maharaj) केलेल्या विधानामुळे चर्चा रंगल्या आहेत.
Govinddevgiri Maharaj)
Govinddevgiri Maharaj)sarkarnama

पुणे: विवेक समूहातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिलिंद आणि शिल्पा सबनीस लिखित 'समग्र वंदे मातरम' (Samagra Vande Mataram) हिंदीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज (किशोर व्यास) यांच्या हस्ते झाले. यावेळी भाववाढीवरुन गोविंददेवगिरी महाराजांनी (Govinddevgiri Maharaj) केलेल्या विधानामुळे चर्चा रंगल्या आहेत.

''आंतरराष्ट्रीय पातळीवर देश प्रगती करत असताना लोकांनी महागाई सहन केली पाहिजे, देशातील निवडणुका कांदा, बटाटा, पेट्रोल, डिझेल यांच्या भाववाढीवरून होतात. भाववाढीवरून ओरडणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे,'' असे गोविंददेवगिरी महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली.

गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, ''सत्तर वर्षे झोळी पसरणारा देश आता जगाला लस देत आहे. ७० वर्षे हळहळणाऱ्या भारतमातेच्या चेहऱ्यावर २०१४ पासून हास्य फुलले आहे. देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही. देशाला मातेचा दर्जा असून वंदे मातरम म्हणजे तिला नमन आहे. वंदे मातरम या काव्यात भविष्य घडविण्याचे तेज आहे. केंद्रातील सत्तेपाशी साम्यवादी लोक होते म्हणून रामसेतू कोणी बांधला नाही, असे बिंबवले जात होते.''

Govinddevgiri Maharaj)
कंगनाच्या विरोधात कॉग्रेस आक्रमक ; देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

''स्वातंत्र्य कसे मिळाले, पारतंत्र्य म्हणजे काय हे नवीन पिढीला कळले पाहिजे. भाजपचे लोक वंदे मातरम आणि भारत माता की जय असे सतत म्हणतात, अशी चेष्टा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांना ही ताकद माहीत नाही.'' असा टोला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, विश्वस्त धनंजय काळे, अनुवादक गंगाधर ढोबळे, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेकर उपस्थित होते.

जा आणि रडत बस ; वरुण गांधीना कंगनाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : '१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे,' असे विधान अभिनेत्री कंगना राणावत हिनं केलं आहे. तिच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला आहे.

भाजपचे खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी कंगनावर (Kangana Ranaut) हल्लाबोल करुन नाराजी व्यक्त केली होती. वरुण गांधींना कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना आपल्या विधानावर ठाम आहे. 'जा आणि रडत बस'अशी खिल्ली कंगनाने वरुण गांधीची उडवली आहे. कंगनाने वरुण गांधी यांना इन्स्टाग्रामवर उत्तर दिले आहे, कारण तिचं ट्विटर अकाऊंटवर बंदी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com