राष्ट्रवादीकडून भामा आसखेड प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान ; भाजपचा पलटवार

PCMC : जॅकवेलच्या कामातील भ्रष्टाचार राष्ट्रवादीने सिद्ध केला,तर राजकारणातून सन्यास घेणार...
BJP-NCP, PCMC Latest News
BJP-NCP, PCMC Latest NewsSarkarnama

पिंपरी : भामा-आसखेड (ता.खेड)धरणातून पाणी उचलण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका बांधत असलेल्या जॅकवेलच्या कामात गत सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी प्रशासनाच्या संगनमताने तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॅाग्रेसने काल (ता.३० नोव्हेंबर) केला होता.

दरम्यान, पालिका मुख्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या सह शहर अभियंत्यांना घेराव घालून या कामाची निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी पालिका आयुक्तांकडे काल केली होती. यावर राष्ट्रवादीकडून भामा आसखेड प्रकल्प ‘विसर्जित’करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा घणाघात भाजपने आज केला आहे. (BJP-NCP, PCMC Latest News)

BJP-NCP, PCMC Latest News
Bhagat singh Koshyari : गुजरात निवडणुकीनंतर होणार राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी?

जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे राष्ट्रवादीने (NCP) सिद्ध केले, तर आपण राजकारणातून सन्यास घेऊ,असे आव्हान भाजपाचे (BJP) प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी पालिकेतील (PCMC) पक्षाचे माजी सभागृहनेते एकनाथ पवार यांनी आज दिले. यामुळे या दोन राजकीय पक्षांत कलगीतुरा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

BJP-NCP, PCMC Latest News
राज्यपालांविरोधातील आंदोलनात पुण्यातील भाजपाचे माजी महापौर सहभागी होणार ?

पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प अडविणारी राष्ट्रवादी आता भामा आसखेड प्रकल्पाच्या कामातही खोडा घालण्याचे पाप करीत आहे,असा हल्लाबोल पवार यांनी केला.असा खोडा घालून हा प्रकल्पही विसर्जित करण्याची त्यांच्या नेत्यांची मानसिकता असल्याचा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचाराचा आरोप करीत भाजपाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा घाट घातला जात आहे,असे ते म्हणाले. तसेच, या कामाची निविदा रद्द करण्याची मागणी करीत शहरवासियांचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे,असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीत भाजपा महाविकास आघाडीला डोईजड ठरणार असल्याने राष्ट्रवादीला पोटशूळ उठला आहे,अशी कडवट टीकाही त्यांनी केली. निविदा राबवल्यानंतर तीन महिन्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाग आली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.पालिका भवनात येवून संबंधित अधिकाऱ्यांना काल घेराव घालणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या व्यावसायिक नेत्यांचाच मोठा भरणा होता, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com