कृषी कायद्यावरून छाती बडवण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या

राज्य सरकार शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करीत आहे.
कृषी कायद्यावरून छाती बडवण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या
राम सातपुतेसरकारनामा

पुणे : कृषी कायद्यावरून छाती बडवून घेणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली आहे. शेतकऱ्यांचा खरोखरच कळवळा असेल तर सरकारने विनाअट वीज जोडून द्यावी व शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचा उद्योग त्वरीत बंद करावा, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

 राम सातपुते
पवारांविषयी चुकीची कॉमेंट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला खासदार बापटांनी झापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आज देश आणि राज्यभरात भाजपेतर राजकीय पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. पाश्‍र्व‍भूमीवर आमदार सातपुते यांनी ट्विट करीत वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर टीका केली आहे.शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेल्या गाईचं पाणी बंद करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकरी त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे सातपुते यांनी म्हटले आहे.

 राम सातपुते
कॉंग्रेसचा महाविकास आघाडी सरकारला `आहेर`: पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा...

राज्य सरकार शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करीत आहे.राज्य सरकारला शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असती तर या सरकारने शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत दिली असती.वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्याची वीज कापण्याचा उद्योग केला नसता. मात्र, शेतकऱ्यांची कसलीही काळजी नसलेल्या या सरकारने या शेतकऱ्यांच्या नावावार केवळ राजकारणाचा खेळ सुरू केला आहे.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक केली आहे.अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. मात्र, राज्य सरकार कोणत्याही प्रकारे मदत करायला तयार नाही. इंधन दरवाढ केंद्र सरकारने कमी केली. राज्य सरकारची जबाबदारी असतानाही सरकार काहीच करायला तयार नाही. राज्य सरकार केवळ केंद्र सरकारला जबाबदार धरून आपली जबाबदारी झटकू पाहात आहे, अशी टीका आमदार सातपुते यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in