संग्राम थोपटेंचे ‘राजगड’वर दणदणीत वर्चस्व : कारखान्याच्या सर्व १७ जागांवर काँग्रेस विजयी!

राजगड साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेसचा सर्व १७ जागांवर विजय; थोपटे यांचे वर्चस्व स्थापनेपासून अबाधित
Rajgad Sugar Factory Election
Rajgad Sugar Factory ElectionSarkarnama

भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी काँग्रेसचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसकडून (Congress) राष्ट्रवादी (NCP)आणि भाजप (bjp) उमेदवारांचा दारुण पराभव झाला. यामध्ये १० उमेदवार अगोदरच बिनविरोध झाले होते, तर निवडणुकीत सात जणांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारास धूळ चारून विजय मिळविला. स्थापनेपासून वर्चस्व असलेल्या राजगडची तंटबंदी थोपटे यांच्या पुढच्या पिढीनेही म्हणजे आमदार थोपटे यांनी कायम राखली आहे. (Congress wins all 17 seats in Rajgad Sugar Factory elections)

काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी स्थापन केलेल्या या राजगड सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासूनच काँग्रेसचे पर्यायाने थोपटे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. अनंतराव थोपटे यांच्यानंतर आमदार संग्राम थोपटे हेही कारखान्याची धुरा मोठ्या चाणाक्षपणे संभाळत आहेत, त्याचा प्रत्यय याच निवडणुकीत विरोधकांसह संपूर्ण पुणे जिल्ह्याला आला. कारखान्याच्या 17 जागांपैकी काँग्रेसचे 10 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते, उर्वरीत तीन गटांमधील ७ जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे 7, राष्ट्रवादीचे 3 आणि भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश होता. मतदानानंतर काँग्रेसचे सातही उमेदवार विजयी झाले.

Rajgad Sugar Factory Election
मोठी बातमी : भगिरथ भालकेंचे बैठकीसाठी भाजपच्या धनंजय महाडिकांना निमंत्रण!

निवडणुकीनंतर बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, भोर तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या पदाधिका-यांनी राजगड कारखान्याची निवडणूक हेतूपुरस्कर लादली असून त्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः रिंगणात न उतरता इतरांना पुढे केले. खरे तर विरोधकांच्या स्वयंघोषीत पदाधिकाऱ्यांनी रिंगणात उतरायला हवे होते. कारखान्याच्या सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. छाननीत उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर अपिलात राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तरीदेखील त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली आणि केवळ तीनच उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामुळे निवडणूकच्या खर्च होऊन कारखान्याला आर्थिक संकटात आणायचे काम विरोधकांनी केले आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

Rajgad Sugar Factory Election
विठ्ठल कारखाना : अस्तित्वासाठी लढणाऱ्या भगीरथ भालकेंना अभिजित अन्‌ युवराज पाटलांचे आव्हान

आज सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु झाल्यनंतर दुपारी तीन वाजता सर्व गटांचे निकाल हाती आले. निकालानंतर आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचा कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुलालाची उधळण करीत आमदार संग्राम थोपटे यांनी वाजतगाजत चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदारांचे आभार मानले.

Rajgad Sugar Factory Election
‘जयसिद्धेश्वर महाराजांना डिस्टर्ब करण्यासाठी मी सोलापुरात येणार नाही’

बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे- गट क्रमांक ३ सारोळा-गुणंद-खंडाळा - किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण.गट क्रमांक ४ कापूरव्होळ-वेळू-हवेली - विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था - आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती जमाती - अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी - सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग - संदीप किशोर नगीने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.

Rajgad Sugar Factory Election
'मुन्ना महाडिक ताकदवान उमेदवार; नक्की जिंकतील'

निवडणुकीतील विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते - गट क्र. १ भोर देवपाल - सुभाष मारुती कोंढाळकर (5 हजार 117) व उत्तम नामदेव थोपटे(4 हजार 998). गट क्रमांक २ येवली-हातवे बु - सुधीर चिंतामण खोपडे (4 हजार 649), सोमनाथ गणपत वचकल (4 हजार 870), पोपटराव नारायण सुके (4 हजार 942). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत - दिनकर सोनबा धरपाळे (5 हजार 277) व प्रताप धोंडीबा शिळीमकर(5 हजार 196). राष्ट्रवादीचे उमेदवार रामदास किसन गायकवाड, रामचंद्र पर्वती कुडले व पंडीत रघुनाथ बाठे यांचा पराभव झाला असून त्यांना अनुक्रमे 615, 639 व 405 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे अमृत विलास बांदल यांचा पराभव झाला असून त्यांना 884 मते मिळाली.

Rajgad Sugar Factory Election
कृषी कायदे परत आणण्याबाबत सरकार नक्की विचार करेल : केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान

दरम्यान, सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेआठ हजार टन ऊस शिल्लक असून यास विरोधकच जबाबदार आहेत. परंतु कारखान्याची बहुतांश यंत्रणा निवडणूकीच्या कामाला लागल्यामुळे ऊसतोड हव्या त्या प्रमाणात झाली नाही. परंतु ऊस उत्पादकांचा सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना सुरु ठेवणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com