Kasba By-Election : बापट हात देणार का? पटोले म्हणतात मार्गदर्शन घेण्यासाठीच...

Nana Patole Latest News : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
Nana Patole, Girish Bapat
Nana Patole, Girish BapatSarkarnama

Nana Patole Latest News : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. आज (ता. ६) दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसब्याची जागा रिक्त झाली आहे. भाजपने येथे हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने (Congress) रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहिर केली. दरम्यान, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुण्याचे खासदार भाजप नेते गिरीष बापट (Girish Bapat) यांची भेट घेतली. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Nana Patole, Girish Bapat
Chinchwad By Election: शंकर जगतापांनीही भरला उमेदवारी अर्ज; 'हे' आहे कारण?

गिरीष बापट सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे पटोले यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पटोले म्हणाले ही भेट सदिच्छा असून राजकीय नव्हती, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली. गिरीष बापट हात देणार का, असा प्रश्न पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाना म्हणाले, त्यांच्याकडे पंज्या आहेच, त्यांना राजकारणातल्या खाच खळग्यांचा प्रचंड अनुभव आहे. ते राजकारणात माझ्यापेक्षा दोन टर्म सिनिअर आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठीच त्यांना भेटलो, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole, Girish Bapat
Hemant Rasne News : '' मुक्ता टिळकांना उमेदवारी दिली,त्यावेळी मी...''; हेमंत रासनेंचं मोठं विधान

पटोले हे आज पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट घेतली. कसबा मतदार संघामध्ये गिरीष बापट हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदार संघातील राजकारण बापट यांना चांगलेच माहिती आहे. त्यातच पटोले यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com