राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाणार नाही : पवारांच्या बालेकिल्ल्यात नानांची गर्जना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपवर टीका.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या तथाकथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन दाखवावे, असे आव्हान भाजपने दिले होते. ते स्वीकारत पटोले हे शनिवारी (ता.५) या दोन्ही शहरात आले. पुण्यात त्यांनी आढावा बैठक घेतली. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये बाईक रॅली काढली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचवेळी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नाव न घेता त्यांनाही लक्ष्य केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकांत स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी व शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी अगोदरच आपली आगामी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत आता आमची भूमिका काय असणार अशी उलट विचारणा पटोलेंनी यावेळी केली. त्यांच्यामागे फरफटत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना कॉंग्रेस हवी आहे. म्हणून पुणे आणि पिंपरी पालिकांत विजयी होऊ, असा दावा त्यांनी केला. कारण कॉंग्रेसचे मूळ या दोन्ही शहरात असून पिंपरीत, तर पक्ष सत्तेतही होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज वसंतपंचमी असून वसंत ऋतूची सुरवात झाल्याने या दोन्ही शहरात कॉंग्रेसची नवी हिरवी पालवी फुटेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे, यावर बोलताना कोण मजबूत आहे किंवा नाही, हे जनता ठरवते, असे सांगत त्यांनी या दाव्याची खिल्ली उडवली.

Nana Patole
700 शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकांमध्ये भाजपला दिसेल

भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. खोटे बोलून ते देशात सत्तेत आले आणि आता त्यांनी देशच विकायला काढला आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केला. इथे पिंपरी-चिंचवडचे सत्ताधारी हे दिल्लीतील त्यांच्या आकासारखेचा वागणार ना, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, आता शहर कॉंग्रेसमय करून प्रा. रामकृष्ण मोरे यांचे स्वप्न साकार करणार, असे सांगत त्यासाठी आपण वरचेवर येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारण आपली मुलगीच या शहरात दिली आहे, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी आपल्या या नियमित येण्यावर दिली.

Nana Patole
लक्ष्मीकांत पार्सेकरांचे फडणवीसांना आव्हान; हरलो तर मी राजकारण सोडेन पण...

यावेळी बीएसपीचे शहराध्यक्ष सुरेश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीकडून शिरुर लोकसभा लढलेले राहुल ओव्हाळ, डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रिती गुप्ते, बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, संजीव झोपे आदींनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हे निमित्त साधून इथे आणखी मोठे ऑपरेशन करायचे आहे, असे ते म्हणाले. कारण येथे फक्त घरं भरण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नाव न घेता केला. दरम्यान, भाजपमध्ये तीन महिन्यांपूर्वी गेलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या आज झालेल्या अकाली निधनानिमित्त पटोलेंनी चिंचवडे राहत असलेल्या चिंचवड गावातील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com