'महागाईविरोधातील आवाज दाबण्यासाठीच गांधी कुटुंबाची ईडी चौकशी!'

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स दिले आहे.
Congress
Congresssarkarnama

पिंपरी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स दिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने (Congress) आज देशभर तीव्र आंदोलन केले. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) कॉंग्रेसने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ते करीत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा तीव्र निषेध केला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व मोदी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महागाई आणि बेरोजगारीविरोधातील आवाज दाबण्यासाठी गांधी कुटुंबाची चौकशी हा कुटील डाव असल्याचे कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यावेळी सांगितले. भाजपच्या (BJP) देश व्यापारीकरणाच्या आड गांधी कुटुंब येत असल्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजप व केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर सुरु असून ते कॉंग्रेस व गांधी कुटुंबियांवर सूड उगवत आहेत, असे ते म्हणाले.

Congress
Sonia Gandhi : 'मी इंदिरा गांधींची सून आहे..मी कोणाला घाबरत नाही'

ज्या नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणात हे समन्स सोनिया गांधी यांना बजावण्यात आले आहे ते खूप जुने असून त्यात चौकशी होऊन क्लीन चीटही मिळालेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठ वर्षात हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या मोदी, शहांचा यातून देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तूभ नवले, विरेंद्र गायकवाड, डॉ. मनिषा गरूड, छाया देसले, निर्मला खैरे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, राहूल ओव्हाळ, अभिमन्यू दहितुले, हिरा जाधव, प्रा. किरण खाजेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Congress
त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, गद्दारी करुन त्यांनी सत्ता मिळवली ; ठाकरेंचा हल्लाबोल

त्यांनी मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है आणि सोनिया तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीनेही आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पक्षाध्यक्षांच्या ईडी समन्सविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, बंटी पाटील, रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी आदी त्यात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in