महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा भाजपचा घाट; काँग्रेस आक्रमक

हे खासगीकरण रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी दिला.
congress leaders

congress leaders

sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या शंभर बेडच्या नवीन भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा सत्ताधारी भाजपचा (BJP) प्रयत्न पक्षाचेच भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे यांच्यामुळे यापूर्वीच तूर्तास रोखला गेला आहे. त्यांना आता काँग्रेसचीही (Congress) साथ शुक्रवारी (ता.२४) मिळाली. त्यांनी या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केलेला मंजूर ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांसह पालिका सभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत काल जोरदार घोषणाबाजी केली. हे खासगीकरण रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी यावेळी दिला.

<div class="paragraphs"><p>congress leaders</p></div>
STचे विलीनीकरण डोक्यातून काढून टाका ; असे अजितदादा का म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसे देशातील फायद्यातील सार्वजनिक उद्योग विकायला काढले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील त्यांचे अनुयायी शहरातील सर्वसामान्यांना आवश्यक वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करुन ठेकेदारांची पोटे भरण्याचा उद्योग करीत आहेत. असा हल्लाबोल डॉ. कदम यांनी पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर केला. पालिका वैद्यकीय सेवेत सुधारणा करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तत्पूर्वी डॉ. कदम यांनी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना या मागणीचे पत्र दिले. माजी मंत्री कॉंग्रेसचे स्व. रामकृष्ण मोरे यांनी दुरदृष्टी ठेऊन शहरातील सर्वात मोठे 750 बेडचे वायसीएम रुग्णालय उभारले.

शहरातील वाढत्या लोकसंख्येची गरज पाहून नवे सुसज्ज असे भोसरी रुग्णालयही आता उभे राहिले आहे. तेथे 90 बेड ऑक्सीजन, तर 10 बेड आयसीयूसह तीन ऑपरेशन थिएटर आहेत. लिक्वीड गॅस आणि ऑक्सीजन जनरेट प्लँट आहे. सर्वसामान्यांच्या करातून उभारलेले हे रुग्णालय प्रशासन खासगी तत्वावर ठेकेदारांची पोटे भरण्यासाठी देत असल्याने त्याला विरोध आहे. भाजपच्या भुलथापांना बळी पडून ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांच्याशी ही प्रतारणा आहे, असे डॉ. कदम म्हणाले. प्राथमिक वैद्यकीय सेवासुविधा देणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे प्रमुख म्हणून तुमची प्रथम जबाबदारी व कर्तव्य आहे, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>congress leaders</p></div>
भाजप आमदारांच्या काकांच्या शेतातून धान्य साठा जप्त ; राष्ट्रवादीची तक्रार

दरम्यान, भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा ठराव कायमचा विखंडीत करण्याची मागणी पालिका सभेत करणार आहे. असे रवी लांडगे यांनी शनिवारी (ता.२५) सरकारनामाशी बोलताना सांगितले. सध्या हे रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून वापरले जात असून तेथे ओमीक्रॉनचे रुग्ण दाखल आहेत. त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी वायसीएमसारखे पालिकेमार्फतच सुरु करावे, असा आपला आग्रह कायम राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com