Sangram Thopte : काँग्रेस आमदार थोपटे फडणवीसांना भेटले आणि आता केला 'हा' खुलासा...

Sangram Thopte News : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संग्राम थोपटे यांनी पडदा टाकला
Sangram Thopte, Devendra Fadnavis
Sangram Thopte, Devendra FadnavisSarkarnama

वेल्हे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या आमदार थोपटे यांच्या भेटीने राजकाणात खळबळ उडाली होती. काँग्रेसचा (Congress) बडा नेता भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या भेटीवर खुद्द आमदार संग्राम थोपटे यांनी खुलासा केला असून देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संग्राम थोपटे यांनी पडदा टाकला आहे.

''मी काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसमध्येच होतो आणि काँग्रेसमध्येच राहणार, काहीजण उगीच बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. असा खुलासा भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. वेल्हे तालुक्यातील वांगणी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता.०८) संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Sangram Thopte, Devendra Fadnavis
Pankaja Munde : कॉम्प्रमाईजचं राजकारण मला शक्य नाही; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?

दोन दिवसांपूर्वी संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावरून काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. संग्राम थोपटे यांनी खुलासा देखील केला होता. ''मी माझ्या मतदार संघातील कामाची चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो'', असे त्यांनी सांगितले होते.

Sangram Thopte, Devendra Fadnavis
Pune Municipal Corporation : पुणेकरांनी दाखवला महापालिकेला हिसका; १६ लाखांचे पाठवले बिल

''मी माझ्या वडिलांचे तत्वज्ञान पाळले आहे, त्याच तत्त्वज्ञानावर चालणार असून राजकारणात प्रत्येक वेळेस आपल्यालाच काही मिळाले पाहिजे असे नसते. तालुक्याच्या विकासाबाबत विरोधी पक्षातील नेत्यांना भेटत असेल तर त्यास मला कमीपणा वाटत नाही'', असे संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले. ''ठेविले अंनती तेसेची राहावे, चित्ती असु द्यावे समाधान'', असा दाखला देत त्यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com