आमदार शेळकेंचा काँग्रेसला धक्का : माजी उपनगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मावळात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्या जोरावर आगामी निवडणुकांमध्ये लोणावळा व देहूरोड येथे राष्ट्रवादीस सत्ता प्रस्थापित करणे पक्षाला सोपे होणार आहे.
Congress Leader Join NCP
Congress Leader Join NCPSarkarnama

पिंपरी : मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे काँग्रेसला धोबीपछाड देत असताना शेळके यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपपुढे (BJP) तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. (Congress leader of Lonavla Vilas Badekar joins NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवनात माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. यामध्ये विलास बडेकर यांच्यासह लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष, काँग्रेसचे नगरसेवक संजय घोणे, काँग्रेस कामगार आघाडीचे अध्यक्ष फकीर गवळी, लोणावळा शहर उपाध्यक्ष राजू तिकोणे, ज्येष्ठ नेते प्रकाश हरपुडे, पांडुरंग हारडे, काँग्रेसचे देहूरोड शहर कार्याध्यक्ष दीपक चौगुले, काँग्रेस देहूरोड शहर युवक अध्यक्ष संदीप डुगळज, भारतीय वाल्मिकी समाज उपाध्यक्ष संदीप सुरेश बोथ, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे मावळ उपाध्यक्ष इस्माईल इब्राहीम शेख यांचा समावेश आहे.

Congress Leader Join NCP
सोलापूरचे खासदार संसदेत कधी भेटतच नाहीत : सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

लोणावळा नगरपरिषद व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीच्या तोंडावर लोणावळा व देहूरोड येथील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे मावळात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्या जोरावर आगामी निवडणुकांमध्ये लोणावळा व देहूरोड येथे राष्ट्रवादीस सत्ता प्रस्थापित करणे पक्षाला सोपे होणार आहे. लोणावळा नगरपरिषदेत यापूर्वी भाजप आणि कॉंग्रेस युतीची सत्ता होती. मात्र आमदार शेळके यांनी लोणावळ्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनादेखील राष्ट्रवादीत घेतल्याने याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे.

Congress Leader Join NCP
पवारसाहेबांना बोलावून नीलेश लंकेंनी माझा अन्‌ अजितदादांचाच 'करेक्ट कार्यक्रम' केला!

या कार्यक्रमात बोलताना मंत्री आव्हाड म्हणाले की, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कामाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. सुमारे २५ वर्षांच्या प्रयत्नांनंतर अशक्य असा मावळचा बालेकिल्ला शेळके यांनी राष्ट्रवादीला जिंकून दिला आहे. केवळ निवडून न येता जनसेवेच्या कामांचा ओघ त्यांनी सुरू केला, असे सांगत त्यांनी आमदार शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Congress Leader Join NCP
अशोक चव्हाण, सतेज पाटलांना जे जमलं, ते राष्ट्रवादीला पंढरपुरात का जमलं नाही?

लोणावळा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आव्हाड यांनी या वेळी दिले. विलास बडेकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराला मावळ विधानसभेत पुढे नेण्यासाठी ते सहकार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना आव्हाडांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com