'राम, हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना सीतेविषयी आदर निर्माण करण्याची गरज'

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा
nana patole, devendra fadnavis  Latest News
nana patole, devendra fadnavis Latest Newssarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16 मे) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावर कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी देखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे, अशी खोचक टीका पटोंलेंनी भाजपवर केली आहे. (Nana Patole, Devendra Fadnavis Latest Marathi News)

nana patole, devendra fadnavis  Latest News
राष्ट्रवादी आक्रमक; महिला पदाधिकाऱ्याला मारहाण भाजप नेत्याला महागात पडणार

वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान नाना पटोले यांनीही या घडलेल्या प्रकाराबद्दल आपली नाराजी व्यक्त करत भाजपला खडेबोल सुनावले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, "केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी देखील आदर निर्माण करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी. या घटनेची चौकशी करत दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, हीच आमची मागणी आहे", अश्या शब्दात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत भाजपला सुनावले आहे.

याप्रकरणी बोलतांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, चूक कोणाची आहे हे पाहण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.

nana patole, devendra fadnavis  Latest News
पवारांची मोठी घोषणा; आगामी महापालिका, ZP निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे धोरण ठरले!

वैशाली नागवडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईबद्दल वैशाली नागवडे म्हणाल्या की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आहे. या आरोपींना वेळीच अटक व्हायला हवी. पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com