अखेर मोदींच्या फेट्यावरील राजमुद्रा काढण्यास काँग्रेसने भाग पाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा (Chhatrapati Shivaji Maharaj) मोठा करण्याचा हा प्रकार होता, असा आरोप कॅाग्रेसकडून (Congress) करण्यात आला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासाठी पुण्याच्या महापौरांनी तयार केलेल्या फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राजमुद्रेस काँग्रेस (Congress) पक्षाने आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. राजमुद्रेचा अवमान रोखण्यात कॉंग्रेसला यश आले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी व्यक्त केली आहे.

PM Narendra Modi
पवारसाहेबांनी अठरापगड जातीतल्या लोकांना संधी दिली म्हणून हा धनंजय मुंडे दिसतोय..

पुणे मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी खास फेटा तयार करून घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची मानबिंदू आहे. पण महापालिकेतील भाजप आणि महापौरांनी हेतुपुरस्सर राजमुद्रा असलेला फेटा वापरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याची मालिका चालू ठेवली. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा करण्याचा हा प्रकार होता. यास काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवून या प्रकाराला विरोध केला. अखेरीस फेट्यावरील राजमुद्रा काढणे भाजपला भाग पडले आणि काँग्रेसच्या लढ्याला यश मिळाले असून सत्तेच्या जोरावर मनमानी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने दणका दिला, असे जोशी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारच भाव खाऊन गेले!

मोदींचे विमान पुण्यात उतण्यापूर्वीच महापौर मोहोळांवर ओढावली नामुष्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येण्याआधीच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर नामुष्की ओढावली. पंतप्रधान मोदी यांच्या फेट्यावर वापरण्यात आलेली राजमुद्रा काढण्याची वेळ भाजपवर आणि मोहोळांवर आली. काँग्रेस आणि मराठा संघटनांच्या आक्षेप आणि विरोधानंतर ही राजमुद्रा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी खास असा शाही फेटा तयार करवून घेतला होता. या फेट्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क ऑस्ट्रेलियन डायमंडपासून आणि सोन्याच्या वापरापासून बनवला आहे.

या फेट्याबाबत 'सरकारना'माशी बोलताना मुरुडकर म्हणाले की, ऐतिहासिक पुण्यनगरीत येणाऱ्या पंतप्रधानांसाठी फेटा देखील ऐतिहासिक स्वरूपाचा असावा, यासाठी आम्ही फेट्याचे जवळपास २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर त्यांच्या कपड्याच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. तर फेट्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिल्याचे सांगितले. मात्र, या राजमुद्रेवर काँग्रेस आणि मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर ही राजमुद्रा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com