राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेनंतर काँग्रेसचाही पिंपरी पालिकेवर झेंडा फडकावण्याचा निर्धार

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या (BJP) भ्रष्ट कारभारावर सर्वसामान्यांत तीव्र नाराजी आहे.
Kailas Kadam

Kailas Kadam

sarkarnama

पिंपरी : नवे अध्यक्ष मिळताच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) कॉंग्रेस नव्याने कामाला लागली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रपणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत (Municipal elections) पक्षाचा झेंडा फडकावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांनी एकजुटीने जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीला पायबंद घालण्यासाठी वर्षभर आंदोलन करुन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आपण सर्वजण एकजूटीने महानगरपालिकेतील भाजपची (BJP) सत्ता उलथून टाकू, असा निर्धार शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी मोशी प्राधिकरणात झालेल्या शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सोमवारी (ता.१३) केला.

<div class="paragraphs"><p>Kailas Kadam</p></div>
मोदींनी केलेले पाप कुठल्याच पवित्र नदीत धुवून निघणार नाही..

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभारावर सर्वसामान्यांत तीव्र नाराजी आहे. त्याचा उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील, असेही कदम म्हणाले. पालिका निवडणुकीत कोणाशी आघाडी करायचे ते वरिष्ठ ठरवतील. कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी काम करावे. कारण, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असल्याने कॉंग्रेसच्या पक्षवाढीस वातावरण आहे, असे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांनी नावे आणि कार्यअहवाल देण्यास त्यांनी सांगितले. आजी, माजी, नवे, जुने अशा सर्वांना बरोबर घेऊन एकदिलाने काम करणार आहे, अशी ग्वाही कदम यांनी दिली.

पक्षाची नवी शहर कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पक्षाचे प्रदेश सचिव गौतम आरकडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह वालिया तसेच बाबा बनसोडे, हिराचंद जाधव, ज्ञानेश्वर मलशेट्टी आदी या बैठकीला उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Kailas Kadam</p></div>
महाविकास आघाडी सरकार पडणार का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले...

डॉ. कदम यांच्या रुपाने शहराला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले असल्याचे सांगत त्यांच्या नियुक्तीपासून पक्ष संघटनेत नवचैतन्य आले आहे, असे आरकडे म्हणाले. शहर कार्यकारिणीत सर्व जाती धर्मातील, ज्येष्ठ, महिला, युवक, युवतींना, कामगारांना संधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in