Kasba by-election News :...तर रवींद्र धंगेकर आज भाजपचे आमदार असते!

Ravindra Dhangekar News : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Ravindra Dhangekar News
Ravindra Dhangekar NewsSarkarnama

Kasba by-election : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.

कसबा विधानसभा मतदारस संघावर अनेक वर्ष भाजपचे वर्चस्व होते. मात्र, तरीही या पोटनिवडणुकीत काँग्रेसने (Congress) विजय मिळवला आहे. कसब्यात ३१ वर्षांनतर इतिहास घडला आहे. मात्र, या विजयामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क त्यांची वैयक्तीक ताकद ही जमेची बाजू होती. भाजप विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच ही निवडणूक झाली. धंगेकर उमेदवार असल्यामुळेच काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला निवडणूक सोपी गेली.

Ravindra Dhangekar News
Kasba By-Election Result: कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला; पोटनिवडणुकीतच भाजपचा गड खालसा

या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. रवींद्र धंगेकरच २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छूक होते. तेव्हा त्यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमालाही धंगेकर गेले होते. मात्र, त्यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी विनंती केली होती. की धंगेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश नको. धंगेकर भाजपमध्ये आल्यास आपली संधी हुकेल, अशी अनेकांना धास्ती होती. त्यामुळे त्यांना विरोध केला गेला.

त्यामुळे धंगेकरांचा भाजप प्रवेश टळला. त्यामुळे धंगेकरांनी आज भाजपचा अनेक वर्षापासूनचा गड खालसा केला. त्यामुळे याची अधिक चर्चा रंगली आहे. धंगेकर भाजपमध्ये आले असते तर ते आज उमेदवार होऊ शकले असते, अशीही चर्चा आहे. मात्र, काँग्रेसने धंगेकरांना हेरले महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद त्यांच्या पाठिमागे लावली. त्यामुळे त्यांचा दणदणीत विजय झाला आहे.

Ravindra Dhangekar News
Kasba Peth Result : हक्काच्या प्रभागांमध्ये भाजपची निराशा; हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी घेतली इतकी मते

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या वॉर्डासह भाजपचा प्रभाग असलेल्या वॉर्डामध्येही रासने यांना चांगली मते मिळाली नाही. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंडा असल्याचे मानले जात आहे. भाजपने येथे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली नाही. त्याचाही फटका बसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com