पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच ; राष्ट्रवादीनं पटकावला पहिला 'क्रिकेटनामा' चषक

#Sarkarnama #cricketnama "मी आधीच सांगितले होते राष्ट्रवादी जिंकणार. आता महापालिका देखील राष्ट्रवादीच जिंकणार. महापौर राष्ट्रवादीचाच होणार," असे प्रशांत जगताप म्हणाले.
Prashant Jagtap
Prashant Jagtapsarkarnama

पुणे : राजकीय नेते, पोलिस अधिकारी अन् क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला सहकारी पक्ष शिवसेनेवर मात करीत रविवारी सरकारनामा 'क्रिकेटनामा'चषक (Sarkarnama cricketnama matches) पटकावला.'क्रिकेटनामा' चषक पटकावणारा राष्ट्रवादी हा पहिला संघ ठरला. (Sarkarnama cricketnama matches in Pune)

"महापालिका निवडणूक महाविकास आघाडी लढविणार असली तरी पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल," असा विश्वास राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष व सामन्याचे कॅप्टन प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी व्यक्त केला. 'क्रिकेटनामा' चषक पटकविल्यानंतर जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी आधीच सांगितले होते राष्ट्रवादीच जिंकणार.

सरकारनामाचा 'क्रिकेटनामा'स्पर्धेत शिवसेनेपुढे ४८ धावांचा डोंगर उभा केलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला २६ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हा सामना राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा केला. दोन्ही संघाने डावपेच रचल्याने चुरस निर्माण झाली होती. "मी आधीच सांगितले होते राष्ट्रवादी जिंकणार. आता महापालिका देखील राष्ट्रवादीच जिंकणार. महापौर राष्ट्रवादीचाच होणार," असे प्रशांत जगताप म्हणाले.

Prashant Jagtap
Rajya Sabha elections : काँग्रेसकडून मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

शिवसेनेपुढे ४८ धावांचे टार्गेट

राष्ट्रवादीने फलदांजी आणि गोलंदाजीही उजवी ठरली. या सामन्यात शिवसेनेला हरवून राष्ट्रवादीनं 'क्रिकेटनामा' चषकावर आपलं नावं कोरलं. दोन दिवस रंगलेल्या सरकारनामाचा 'क्रिकेटनामा'स्पर्धेत चषक कोण जिंकणार यांची प्रचंड उत्सुकता होती. अंतिम फेरीत राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले. पहिल्यांदा फलंदाजी करुन राष्ट्रवादीने ४८ धावांचे टार्गेट शिवसेनेपुढे ठेवले. त्यात आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी जबरदस्त खेळी करत राष्ट्रवादीला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले.

Prashant Jagtap
Rajya Sabha elections bjp : विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट

अनिकेत तटकरे, ओमराजे निंबाळकर यांची जोरदार खेळी

त्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवसेनेने जिंकण्याचा डाव रचला पण पहिल्याच चेंडूत शिवसेनेचा खेळाडू तंबूत परतला. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार झुंज दिली. मात्र, तेही ११ चेंडूत १४ धावा केल्या. शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या नेतृत्वात शिवसेनेने फायनलमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीशी त्यांनी जोरदार झुंज दिली. अंतिम सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची जोरदार खेळी लक्षणीय ठरली.

सागर बालवडकर यांचा अप्रतिम झेल

पोलिस अधिकारी आणि सर्वक्षीय नेते यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना रंगला. क्रीडामंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही सामन्यात सहभाग घेतला होता. क्रीडामंत्री सुनिल केदार यांची फटकेबाजी अन् ओमराजे निंबाळकरांची गोलंदाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादीचे सागर बालवडकर यांनी अप्रतिम झेल घेतला.

बाळा नांदगावकरांची गोलदांजी लक्षणीय

शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी-पोलिस दल यांच्यात सेमीफायनल झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची गोलदांजी लक्षणीय ठरली. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी या सामन्याकडे पाठ फिरवली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील उपस्थित होत्या. 'खेळीमेळीत हे सामने झाले,' अशा भावना सर्व पक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू..

राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला आता सुरुवात झालीय. पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नेते कामाला लागल्याचं दिसून येत आहे. बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरु झालंय. अशावेळी "पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार. अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू," असा निर्धार प्रशांत जगताप यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com