देशद्रोहाच्या गुन्ह्याचा गोंधळ; चंद्रकांतदादा म्हणाले, पोलिसांना त्यांचे काम करू द्या

Chandrakant Patil| पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही
Chandrakant Patil|
Chandrakant Patil|

पुणे : पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या देणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या समर्थकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत पुणे पोलिसांकडून (Pune Police) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत सध्या मोठी साशंकता निर्माण झाली आहे.

त्यानंतर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही, पोलीस संंभ्रम निर्माण करयातेय का, असे विचारले असता ते म्हणाले की, हा विषय खुप संवेदनशील आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे. त्यामुळे पोलीस विभागावर कोणीही दबाव आणू नये, त्यांना त्यांच काम करु द्या. देशाच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर माझ्यासारख्या मंत्र्यांनेही अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलू नये, असं मला वाटतं. या विषयासाठी राज्याचे गृहमंत्री आहेत.

Chandrakant Patil|
फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधड्या भिजवत होते तेव्हापासून बाळासाहेब शिवतीर्थावरून विचारांचं सोनं उधळत होते..

याचवेळी त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करत सारवासारव केली आहे. तानाजी सावंत काहीह बोलले तरी त्याची मोडतोड करुन दाखवलं जातं. आमच्या रावसाहेब दानवे यांच्याबाबतीतही असचं होतं. तानाजी सावंताना म्हणायचं होतं की, महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजींनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकवलं. पण महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही. अडीच वर्षात तुम्ही का आंदोलने केली नाही, आम्हीही तुमच्यासोबत आलो असतो. उठसूट गैरसमज करुन घेण्याची आवश्यकता नाही, अडीच वर्षे तुम्ही शांत का बसलात हेच, तानाजी सावंत यांना म्हणायचं आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांन दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com