Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गोंधळ; नेमकं काय घडलं?

BJP : गडकरी व्यासपीठावर दाखल होताच...
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Maharashtra Politics News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. गडकरी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे.

यावेळी गडकरी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आले. त्याच दरम्यान, दोन शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला. मात्र, पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे कार्यक्रमात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.

Nitin Gadkari
Kasaba By-Election : उद्या मतदान, दोन लाखाहून अधिक मतदार, वाचा अशी आहे प्रशासनाची तयारी..

नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 चे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पार पडत आहे. यावेळी या महामार्गाच्या लोकार्पणासाठी गडकरी व्यासपीठावर दाखल झाले.पण ते येताच दोन शेतकऱ्यांनी खाली गर्दीत उभं राहून जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

Nitin Gadkari
Pune By-Election : व्होटींग कार्ड नाही? टेंशन घेऊ नका, 'या' बारा कागदपत्रांपैकी एक पुरावा दाखवून करा मतदान !

पोलिसांनी तातडीने घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. तर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासनाने अन्याय केला आहे, अशी तक्रार या शेतकऱ्यांची होती. त्यांनी याबबात निवेदन देण्याचे सांगितले.

मात्र, तरी देखील त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. दरम्यान, यानंतर पुन्हा कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.

Nitin Gadkari
Fadanvis : तुपकरांनी घेतली फडणवीसांची भेट, लाठीचार्जच्या चौकशीची केली मागणी !

तसेच ''या परिसरातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे. यापुढे स्मार्ट शहरं नाही तर आता स्मार्ट गावं देखील झाली पाहिजेत'', असं गडकरी या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com