पुण्यातील विसर्जन सोहळ्याची सात तासात सांगता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने यंदाच्या गणेशोत्सवावर गतवर्षीप्रमाणेच निर्बंध घालण्यात आले.
sarkarnama
sarkarnamasarkarnama

पुणे : कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करत पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्याची सात तासात सांगता झाली. सकाळी साडे अकरा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन सुरू झाले. सायंकाळी साडे सहा वाजे पर्यंत शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी साधेपणाने पण उत्साहाच्या वातावरणात श्री गणेशास निरोप देतानाच कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे असे साकडे बाप्पाला घातले.(Conclude the immersion ceremony in Pune in seven hours)

sarkarnama
  देणी फेडता न आल्याने मनोहर जोशी कुटुंबीयांची मालमत्ता बॅंकांच्या ताब्यात 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने यंदाच्या गणेशोत्सवावर गतवर्षीप्रमाणेच निर्बंध घालण्यात आले. देखावे, मिरवणुकांवर बंदी घालण्यात आल्याने केवळ मांडव घालून साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास शहरातील सर्व गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला. १० दिवसाच्या आनंदपर्वाची आज (रविवारी) सांगत होत असताना पुणेकरांनी संयम दाखवून दिला. मिरवणुका काढता न आल्याने ढोल ताशाचे बहारदार वादन, साहसी खेळ, शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिक, पथनाट्य यास पुणेकर सलग दुसऱ्या वर्षी मुकले.

मानाचा पहिला ग्रामदैवत कसबा गणपती, मानाचा दुसरा ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे मंडळाच्याच मांडवात कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी सनई चौघड्यांचे सुरेल मंगलमय सुरांमुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर या... पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणा देत भाविकांनी मानाच्या गणपतींना निरोप दिला. दरम्यान, तुळशीबाग मंडळाने ढोलताशाच्या तालावर मिरवणुक काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून साहित्य जप्त केले. शहरातील सर्वच भागात लहानमोठ्या मंडळांनी मिरवणुका न काढता विसर्जन केले.

दुपारी श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळांनी साधेपणाने विसर्जन केले. सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई गणपती मंडळाने विसर्जनासाठी तयारी सुरू केली. शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करताना पूजा करण्यात आली. त्यानंतर उत्साहात मोरया मोरयाच्या जयघोषात दगडूशेठ गणपतीचे सायंकाळी ६ वाजून ३० मिनीटांनी तर मंडई गणपतीचे सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी विसर्जन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com