Sanjay Raut News : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार : नाशिकपाठोपाठ भोर पोलिसांतही तक्रार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरणे भोवण्याची शक्यता
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

नसरापूर (जि. पुणे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात नाशिकमध्ये रविवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये देखील गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेनेचे भोर (Bhor), वेल्हे तालुकाप्रमुखांनीही खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. (Complaint filed against Sanjay Raut in Rajgad police station)

शिवसेनेचे भोर-वेल्हे तालुकाप्रमुख गणेश मसुरकर यांनी नसरापूर राजगड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २० फेब्रुवारी) तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. या निषेधार्थ संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अन्यथा भोर-वेल्हा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा तक्रार अर्जात दिला आहे.

Sanjay Raut
Bhagat singh Koshyari : बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट :‘ मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो; पण...’

एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे एक घटनात्मक पद आहे. संजय राऊत यांनी त्या घटनात्मक पदाचा अपमान करून घटनेचाही अपमान केला आहे. दरम्यान, कंगना राणावत हिने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांचा फक्त एकेरी शब्दात उल्लेख केला; म्हणून राणावत हिच्यावर कारवाई झाली होती. त्याच कायद्याचा आधार घेवून आज संजय राऊत यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, असेही राजगड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

Sanjay Raut
Pawar-Shinde News : मुख्यमंत्रिपदाबाबत पवारांची सुशीलकुमार शिंदेंना गुगली : ‘तुमचं काय सांगता येत नाही...’

गणेश मसूरकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी अपशब्द वापरले आहेत. त्याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी चौकशी करून येत्या ४८ तासांत गुन्हा दाखल करून कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com