Pune News : सरकारचे उशिराने शहाणपण; हुतात्मा राजगुरू स्मारक आराखडा समितीत अखेर स्थानिकांचा समावेश !

Sudhir Mungantiwar : राजगुरु जन्मस्थळ परिसराचा अंतिम विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama

पिंपरी : राजगुरुनगर (ता.खेड,जि.पुणे) येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसराचा अंतिम विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा राज्य विधीमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच (ता.१३) केली होती. त्यानुसार सरकारने समिती स्थापण्याचा जीआर लगेचच दुसऱ्या दिवशी (ता.१४) काढला.

पण, राजगुरुनगरच्या या हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाच्या विकास आराखड्याच्या समितीत स्थानिक खासदारांसह (डॉ.अमोल कोल्हे) स्थानिक तज्ज्ञांना डावलण्यात आले. तर, सदस्य म्हणून पुणे, मुंबईतील भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली होती.

Sudhir Mungantiwar
Pune News : पुण्यात भाजप अन् 'आप'मध्ये जुंपली; मिळकतकराच्या मुद्यांवरून ट्विटरवॉर

पहिल्या जीआरमधील ही गंभीर चूक लक्षात येताच राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने दुसरा जीआर आज (ता.१७) काढला. त्यात आता स्थानिक खासदारांसह स्थानिक माहितगार आणि हुतात्मा राजगुरुंच्या कार्य आणि स्मारकाशी सबंधित व्यक्तींना स्थान दिले गेले आहे.

मात्र, यासंदर्भात १३ तारखेला विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेले स्थानिक आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल, हा मुनगंटीवारांचा शब्द पाळला गेला नाही.

पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात आमदार मोहिते हे फक्त सदस्य आहेत. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान व थोरला वाडा सन 2000 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजगुरुवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूच्या पूवेकडील खोलीत 24 ऑगस्ट, 1908 रोजी हुतात्मा राजगुरुंचा जन्म झाला होता.

Sudhir Mungantiwar
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस लाच प्रकरणात नवा ट्विस्ट; बुकी जयसिंघानी अन् उद्धव ठाकरेंचं कनेक्शन?

तेथे त्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यासाठी १४ मार्चला राज्य सरकारने २१ जणांची समिती स्थापन केली. विभागीय आयुक्त हे तिचे अध्यक्ष आहेत. पण, त्यात आमदार मोहिते हेच एकमेव राजगुरुनगरचे रहिवासी असून खेड तालुक्यातील इतर तिघे वगळता बाकीचे सर्व १७ सदस्य हे पुणे, मुंबईतील आहेत.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे स्थानिक विद्यमान खासदारांना या समितीत स्थान न देता माजी खासदारांना (शिवाजीराव आढळराव-पाटील), मात्र, ते देण्यात आले होते. हुतात्मा स्मारक समितीसह हुतात्मा राजगुरुंच्या परिवारातील सदस्याला सुद्धा या समितीतून दूर ठेवण्यात आले होते.

Sudhir Mungantiwar
Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ कोटी रुपयांचा घोटाळा?

ही चूक लक्षात येताच आज तातडीने यासंदर्भात दुसरा जीआर काढून त्यात हुतात्मा राजगुरुंचे नातू सत्वशील यांच्यासह खा.डॉ.कोल्हे, राजगुरुनगरमधील हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले अतुल देशमुख, सदस्य संजय घुंडरे-पाटील, सुशील मांजरे, क्रांतीवीर राजगुरु मेमोरिअल ट्रस्टचे विठ्ठल पाचारणे अशा आणखी आठजणांना सदस्य म्हणून घेण्यात आले. त्यात भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांचीही वर्णी लावण्यात आली.

दरम्यान, या समितीची आज मंत्रालयात पहिली बैठक झाली. हुतात्मा राजगुरू जन्मस्थळाचा विकास करताना तिथल्या प्रत्येक खांबातून, विटेमधून आणि भिंतीतून स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची अनुभूती देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे.

तसेच हे काम अभियान स्तरावर होणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. या कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com