सहकारी बॅंका सोमवारी बंद राहणार; लतादीदींना श्रद्धांजली

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले आहे.
Co-Operative Bank
Co-Operative Bank Sarkarnama

पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून, राज्य सरकारने सोमवारी (ता ७ फेब्रुवारी) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली सोमवारची सुट्टी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ नुसार जाहीर केल्याने सर्व बँकांना सदरची सुट्टी लागू असते यामुळे उद्याची सुट्टी ही सर्वच बॅंकांना असणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहितेंनी दिली आहे. त्यामुळे उद्या बॅंकानाही सुट्टी असणार आहे.

Co-Operative Bank
एका फोनवर लतादीदीने दिलेला शब्द पाळला अन् युसूफचा युसूफभाई झाला..

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यसरकारने दुखवटा पाळत उद्या सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१चा अधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ नुसार सर्वच बॅंकाना सुट्टी असते, असे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. यामुळे बॅकेच्या खातेदारांनी नोंद घ्याव व सर्व बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Co-Operative Bank
लतादीदी आयुष्यभर अविवाहित राहिल्या कारण...

दरम्यान, लता मंगेशकर यांचे आज (ता.6 फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला असून लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. लतादीदींच्या सन्मानार्थ दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

दुसरीकडे राज्य सरकारनेही दुखवटा घोषित करत सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. संगीत आणि कलाविश्वाची मोठी हानी झाल्याने या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे राज्यसरकारने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com