पुण्यात येण्याआधीच मुख्यमंत्र्यांवर नामुष्की; 'एकनाथ शिंदे' उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द

Eknath Shinde | Shivsena : हे नामकरण नियमबाह्य असल्याची काही स्वयंसेवी संघटनांची तक्रार
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeSarkarnama

पुणे : नाशिक, औरंगाबादचा दौरा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर एक उद्घाटन सोहळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यांच्या हस्ते पुण्यात होणाऱ्या 'एकनाथ शिंदे उद्याना'चा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. (Shivsena | Eknath Shinde | Latets News)

पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर संबंधित उद्यान उभारण्यात आल आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले होते. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा सर्व खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला होता. या प्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असाही त्यांनी दावा केला होता.

Chief Minister Eknath Shinde
महाडिकांचा दुसरा घाव 'गोकूळ'वर; पाटलांकडून एक-एक किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग

मात्र या नामकरणाला अद्याप प्रशासकीय मान्यता नाही, असा दावा करत काही हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केली होती. तसेच या कार्यक्रमाबाबतही महापालिकेला अंधारात ठेवण्यात आले होते. याबाबत आज काही वृत्तपत्रांनी आणि चॅनलने वार्तांकन केले. त्यानंतर पुढील अकारण होणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने उद्घाटन कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती आहे.

Chief Minister Eknath Shinde
काय शिकवलयं की नाय या पोराला? शहाजीबापूंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

पुण्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनीही कार्यक्रम रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in