Pune News : जी २० परिषदेची लगबग, प्रशासन अॅक्टीव मोडवर; पुणेकरांनो सावधान अन्यथा भरावा लागणार दंड

Pune News : तब्बल ४९४ जणांवर कारवाईचा बडगा
Pune Penalty
Pune Penalty Sarkarnama

पुणे : पुण्यात जी २० परिषदेची बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असून या परिषदेच्या वेळेस शहर स्वच्छ दिसावे यासाठी सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तर जी २० परिषदेचे (G20 Conference) शिष्टमंडळ पुण्यात येण्याआधी पालिकेची धावाधाव सुरू झाली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे यामुळे स्वच्छता करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अडथळे निर्माण होत आहेत.

जनजागृती करून प्रतिसाद दिला जात नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाने बेशिस्त नागरिकांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. तर बेशिस्त नागरिकांना धडा देखील शिकवला जात आहे. या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत ४९४ जणांवर कारवाई करून तब्बल १ लाख ६८ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

२०२१ मध्ये केंद्र सरकारच्या (Central Govt) ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश झाला होता. मात्र २०२२ मध्ये नववा क्रमांक आला. मुळामुठा नदीमध्ये मैलापाणी जात असल्याने पुण्याचे नामांकन घसरले होते. त्या बरोबरच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता नसल्याचाही फटका बसला होता.

यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे हे प्रकार तर वारंवार घडत आहेत. तसेच रस्त्यावर गुटखा, पान खाऊन थुंकणे, स्वच्छता गृहाऐवजी उघड्यावर लघुशंका करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. शिवाय उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागात पाळीव प्राण्याला रस्ता किंवा पादचारी मार्गावर शौच्छा करायला लावणे यामुळे शहर घाण होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवरच आता जानेवारीत (January) पुण्यात ‘जी २०’ परिषद होणार आहे. त्यामध्ये ‘जी २०’चे सदस्य तसेच केंद्र सरकारने काही देशांना खास निमंत्रित केले आहे. यामध्ये एकूण ३६ देशाचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत.

Pune Penalty
Konkan News : शिवसेना आक्रमक ; दोन नगरसेवकांसह तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

तसेच त्यांच्या समवेत केंद्र शासनातील (Central Govt) उच्च पदस्थ अधिकारीही उपस्थित असणार आहेत. पुणे (Pune) शहरातील रस्ते डांबरीकरण करून चकाचक केले जातील. पण सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी घाण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

एप्रिल २०२२ ते आॅक्टोबर २०२२ या सात महिन्यात थुंकणे, लघवी करणे यावर अतिशय तुरळक कारवाई केली जात होती. कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणे, करणे वर्गीकरण करता न देणे यावर तर एकाही नागरिकावर कारवाई केलेली नव्हती. पण ‘जी२०’च्या बैठका होणार असल्याने जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

Pune Penalty
Police Officer Transfer : मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी शिसवे तर पिंपरीच्या सह आयुक्तपदी लोहिया

नोव्हेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात कारवाईचा जोर वाढवला आहे. यामध्ये बेशिस्त नागरिकांसह नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड केला जात आहे. यामध्ये एप्रिल ते आॅक्टोबर कालावधीत रस्त्यावर थुंकणाऱ्या ५८ जणांवर कारवाई केली होती. पण आता गेल्या दीड महिन्यात ६१ जणांवर कारवाई केली आहे.

याच पद्धतीने उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर एप्रिल ते आॅक्टोबरमध्ये केवळ ९ केस केल्या होत्या. पण १ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालवधीत ८० जणांवर कारवाई असल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

''शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे, थुंकू नयेत यासाठी महापालिका सतर्क आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यातही ही कारवाई याच पद्धतीने सुरू राहील,'' असं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आशा राऊत यांनी म्हटलं आहे.

Pune Penalty
Pune News : बंब शिक्षकांचा पिच्छा सोडेना, बदल्यांसाठी केलेल्या बोगस शस्त्रक्रियांची माहिती मागवली..

नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये झालेली कारवाई

कारवाईचा प्रकार - नोव्हेंबर - १३ डिसेंबर पर्यंत

थुंकणे - ५३ - ८

दंड - ५०४०० - ८०००

लघुशंका करणे - ५८ - २२

दंड - १७५०० - ४४००

कचरा जाळणे - ३७ - १२

दंड - २६६०० - ४३२०

कचरा वर्गीकरण न करणे - २६० - ३४

दंड - ३७७०० - ४३४०

स्वच्छ संस्थेकडे कचरा न देणे - २६ - ०

दंड - ४७२० -०

गणवेश न घालणे - २० -४

दंड - ३३०० - ४८०

पाळीव प्राण्यांद्वारे घाण करणे - ३३ -७

दंड - ८५२० - २२२०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in