...तर राष्ट्रवादीच्या बादशहा शेखची दौंड शहरातून धिंड काढेन : आक्रमक राणेंचा इशारा

दौंड शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तब्बल २१ दिवसांचा विलंब केला होता.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

दौंड (जि. पुणे) : दौंड (Daund) शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला आणि तरुणांवर प्राणघातक हल्ला प्रकरणाची आणि त्यातील संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीमार्फत (CID) चौकशी करावी. तसेच, यापुढे असे प्रकार घडले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) त्या बादशहा शेखची दौंड शहरातून धिंड काढण्यात येईल, असा इशारा भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे. (CID investigation should be done in Daund molestation case: Nitesh Rane)

दौंड शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तब्बल २१ दिवसांचा विलंब केला होता. पीडितेच्या फिर्यादीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे आदी गुन्हे ९ नोव्हेंबर रोजी दाखल केले. परंतु त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता व दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

Nitesh Rane
केंद्रीय नियुक्तीसाठी बड्या नेत्याच्या ‘पीएं’चा ५० लाखांचा गंडा; डॉक्टरचा मुंबईतील कार्यालयात गोंधळ

बादशहा शेख याला अटक न केल्याने आमदार नितेश राणे यांनी पोलिस उपअधीक्षक राहुल धस व निरीक्षक विनोद घुगे यांना जाब विचारला. पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करून महिलांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी हा इशारा दिला आहे.

Nitesh Rane
महाराष्ट्राच्या नादाला लागतो; त्याचा औरंगजेब होतो : शिवसेना उपनेते बानुगडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

आमदार राणे म्हणाले की, आमच्या महिला भगिनी पोलिस ठाण्यात यायला घाबरत होत्या, एवढं भीतीचं वातावरण कोणाच्या जोरावर करून ठेवलं आहे. हे असं बादशहा, भातशहा आम्ही आमच्या जीवनात शंभर बघितले आहेत. काही फरक पडत नाही, आम्हाला. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करावं. आम्हाला दौंड शहरात हिंदु-मुस्लीम विषय करायचे नाहीत. मुस्लीम समाजाला आम्हाला त्रास द्यायचा नाही. जसा तुम्हाला त्रास दिला जाणार नाही, त्याच पद्धतीने आमच्या हिंदु बांधवांनाही त्रास होणार नाही, याची काळजी मुस्लीम समाजाने घ्यायला हवी. बादशहासारख्या कार्ट्याना कोण मोठं करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही.

Nitesh Rane
अशोक पवारांचा ‘मास्टर स्ट्रोक’ : ‘घोडगंगा’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ऋषिराज पवारांच्या हाती!

दौंडमधील विनयंभग आणि हल्लाप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी. मी त्याचा संपूर्ण पाठपुराव करेन. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात मुद्या मी उपस्थित करणार आहे. तुम्ही गप्प बसण्याची भूमिका आता बंद करा. आपल्या अंगावर कोणी आला तर त्याला शिंगावर घ्यायला शिका. तुम्हाला ताकद देण्याचे काम सर्वजण द्यायला तयार आहोत, असा शब्दही राणे यांनी या वेळी दिला.

Nitesh Rane
शिंदे गटाच्या आमदारांना Y दर्जाची सुरक्षा का? दीपक केसरकरांनी दिले हे उत्तर...

बादशहा नावाचा कोणी तरी येतो. आपल्याला त्रास देतो, आपल्यावर अत्याचार करतो आणि आपल्या माताचा भगिनींना घाबरवून सोडतो आणि आपण गप्प बसायचं. यापुढे असले कुठलेही प्रकार घडले तर आंदोलन करून आम्ही थांबणार नाही. तर त्या बादशहा शेखची दौंड शहरातून धिंड काढेन, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com