Junnar News : खासदार कोल्हेंची मागणी डावलून जैविविधता मानके चित्ररथ जुन्नरऐवजी बारामतीला दिला!

प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर केलेल्या जैवविविधता मानके चित्ररथाबाबतचे पत्र १० जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जुन्नर नगरपालिकेला सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने दिले होते.
Chitrarath of Biodiversity Standards
Chitrarath of Biodiversity Standards Sarkarnama

जुन्नर (जि. पुणे) : जुन्नरची (Junnar) बिबट सफारी बारामतीला (Baramati) नेल्याच्या घटनेने तालुक्यात उठलेले वादळ शांत होत नाही, इतक्यात राज्य सरकारच्या वतीने २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर करण्यात आलेला जैवविविधता मानके हा चित्ररथ जुन्नरऐवजी बारामतीला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जुन्नरमधील नागरिकांकडून नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. (Chitrarath of Biodiversity Standards was given to Baramati instead of Junnar)

चित्ररथ संवर्धनातून जुन्नर शहरात आकर्षण केंद्र व्हावे, यासाठी हा चित्ररथ जुन्नरला संवर्धनासाठी मिळावा, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्था तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Chitrarath of Biodiversity Standards
Solapur News : पाणीप्रश्नावर सुभाष देशमुख आक्रमक....थेट देवेंद्र फडणवीसांना लावला फोन!

राज्य सरकारने २०१८ मध्ये जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटनाचा दर्जा दिल्यानंतर विशेष संकल्पना, उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. यात राज्य सरकारच्या वतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर केलेल्या जैवविविधता मानके चित्ररथाबाबतचे पत्र १० जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आणि जुन्नर नगरपालिकेला सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने दिले होते. या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिकेचा अभिप्रायदेखील मागविला होता.

दरम्यान राजकीय सत्तांतराच्या काळात हा विषय थंडावला. मात्र, नुकतेच गिरिभ्रमण संस्थेने जुन्नरच्या पर्यावरणपूरक विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पासाठी विविध संकल्पना मुख्यमंत्री कार्यालयासह अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला सादर केल्या होत्या. या मागण्यांचा पाठपुरावा सुरू असताना सांस्कृतिक विभागाकडून चित्ररथाच्या प्रलंबित मागणीबाबत हा चित्ररथ बारामतीच्या चिंकारा पार्कसाठी देण्यात आल्याची माहिती उघड झाली. चित्ररथ बारामतीला गेल्याने जुन्नरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Chitrarath of Biodiversity Standards
Kolhapur Politics : ‘पाटील कारखान्याच्या सभासदांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांची ‘राजाराम’मध्ये पोळी भाजणार नाही’

जैवविविधता मानके चित्ररथासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा, यासाठी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र दिले होते. मात्र, संबंधित चित्ररथाचे अवशेष बारामतीच्या चिंकारा अभयारण्यात आणून ठेवले असल्याचे पुणे वन विभागातील सूत्रांनी सांगितले.

Chitrarath of Biodiversity Standards
B. S. Yediyurappa News : येडियुरप्पांचा ‘यु टर्न’ : सिद्धरामय्यांच्या विरोधात मुलगा विजयेंद्र लढणार नसल्याची केली घोषणा

जैवविविधता मानके चित्ररथावर शेकरू आणि ब्ल्यू मॉरमॉन या दोन दुर्मिळ वन्यजीवांचा ठळक समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही वन्यजीवांचा अधिवास हा भीमाशंकर आणि नाणेघाट परिसरात असल्याने हा चित्ररथ नैसर्गिक न्यायाने जुन्नरला मिळावा, ही सर्वात पहिली मागणी नोंदविली. यापूर्वी याप्रकारचे चित्ररथ संवर्धनाला मिळावे, अशी कोणीही कधीही मागणी केली नव्हती. आमच्या संकल्पनेतून या चित्ररथाचे संवर्धन आणि सादरीकरण जुन्नर नगरपालिकेच्या जिजामाता उद्यानात करण्याची आमची संकल्पना होती. मात्र, आता हा चित्ररथ बारामतीला देण्यात आल्याने आम्ही निराश झालो असल्याचे संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com