बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भाजप आमदाराबाबत चित्रा वाघ भूमिका घेतील का?

नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आमदारकीचा राजीनामा देतील का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
Ganesh Naik, Chitra Wagh
Ganesh Naik, Chitra Waghsarkarnama

पुणे : भाजप (BJP)आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)यांच्यावर बेलापूर आणि नेरुळ पोलीस ठाण्यात फसवणुक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्यावर अटकेच्या कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या वर्षी पुण्यात एका तरुणीने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली होती. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड हे या प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप करीत विरोधकांनी या मुद्द्यावर रान पेटवलं होतं. त्यानंतर राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आमदारकीचा राजीनामा देतील का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Ganesh Naik, Chitra Wagh
भाजप आमदार नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार ; महिला आयोगाचा दणका

याबाबत अँड असीम सरोदे म्हणाले, ''इतर वेळी जसे मंत्री असलेल्या व्यक्तींना अशाच कारणांसाठी मंत्रिपद सोडावे लागते त्याप्रमाणे गणेश नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देणे नैतिकदृष्ट्या आवश्यक आहे. गणेश नाईक यांच्याबाबत सुद्धा भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ (Chitra Wagh)या स्पष्ट व जाहीर भूमिका घेतीलच कारण त्यांनी सातत्याने महाराष्ट्रातील स्त्रियांचे प्रश्न लावून धरले आहेत. गणेश नाईक प्रकरणी चित्राताई जी भूमिका घेतील त्यावरून त्यांची महिलांच्या प्रश्नांच्या बाबतीतील निरपेक्षता, संवेदनशीलता व कायदेशीरता स्पष्ट होईल,''

''गणेश नाईक व फिर्यादी महिलेच्या संबंधातून झालेल्या मुलाचा स्वीकार गणेश नाईक यांनी वडील म्हणून करायला पाहिजे व त्या महिलेच्या तसेच मुलाच्या भवितव्याची आर्थिक, निवासाची, शिक्षणाची व सन्मानाने जगण्याची सोय केली पाहिजे हे कायद्याच्या दृष्टीने गरजेचे आहे,'' असे सरोदे म्हणाले.

Ganesh Naik, Chitra Wagh
बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा, महाराष्ट्राची बदनामी करु नका ; सुळेंनी सुनावलं

पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलीला न्याय मिळावा अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. त्यामुळे भाजपचे नेते, आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात चित्रा वाघ आवाज उठवतील का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

''गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल,'' असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) काल यांनी सांगितले. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहण्याचा दावा फिर्यादी महिलेने केला आहे. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman)या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in