चित्रा वाघांकडून दरेकरांची पाठराखण : रंगलेल्या गालाचा मुका...हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीचे खरे रूप!

राष्ट्रवादीच्या लोकांचे बड्या लोकांशी असलेले साटेलोटे त्यांनी बोलीभाषेत मांडले. त्यावरून एवढा गहजब माजवणे योग्य नाही.
Praveen Darekar-Chitra Wagh
Praveen Darekar-Chitra WaghSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे', या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावरून राळ उठली असतानाच, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज (ता. २७ सप्टेंबर) येथे झालेल्या महिला मेळाव्यात दरेकरांची पाठराखण केली. दरेकरांचे ते वक्तव्य महिलांचा अपमान करणारे नव्हे; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खरे रूप उघडे करणारे होते, असेही त्या म्हणाल्या. (Chitra Wagh supported Praveen Darekar on the controversial statement)

पुणे, मुंबईत झालेल्या महिला अत्याचारांबाबत इव्हिडन्सशिवाय गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणता इव्हिडन्स शोधला, असा सवाल वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या की, दरेकर यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग मी एकले आहे. त्यात त्यांनी कुठेही महिलांचा उल्लेख केलेला नाही. राष्ट्रवादीच्या लोकांचे बड्या लोकांशी, भांडवलदार, कारखानदारांशी असलेले साटेलोटे त्यांनी बोलीभाषेत मांडले. त्यावरून एवढा गहजब माजवणे योग्य नाही.

Praveen Darekar-Chitra Wagh
मामा आणि भाचेजावयांमध्ये पुन्हा रंगणार सामना

पोलिसांनीही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन गुन्हे दाखल करताना बारकाईने वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती. विनयभंग, बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात इव्हिडन्स मागणाऱ्या पोलिसांनी दरेकर यांच्याविरूद्ध तक्रारदारांकडून कोणता इव्हिडन्स घेतला, हे जरा जाहीर करावे. दरेकर काही चुकीचे बोलले नसताना ओढून-ताणून त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून आवाज दाबण्याचे कारस्थान सत्ताधारी मंडळी पोलिसांना हाताशी धरून करीत आहेत. सत्तेतील लोकांनी दबाव आणून हे गुन्हे दाखल करायला लावले असले तरी न्याययंत्रणेकडून वस्तुस्थिती लोकांसमोर येईल, अशी अपेक्षाही वाघ यांनी या वेळी बोलून दाखवली.

प्रवीण दरेकर यांच्याविरूद्द गुन्हा दाखल करण्यासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना जरब बसेल यासाठी दाखवावी, असे आवाहन वाघ यांनी केले. संजय राठोड यांच्यावरील एफआयआर अद्याप वाऱ्यावरच आहे, बलात्काऱ्यांना सोडविण्यासाठी मोठ्या नेत्यांचे फोन येतात, विनयभंग झालेल्या महिलेबाबत एक मंत्री संशयास्पद वक्तव्य करतात, सांगलीत विनयभंग झाल्यावर तक्रार द्यायला गेलेल्या महिलेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पुरावे मागितले जातात. हे सारेच अनाकलनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.

Praveen Darekar-Chitra Wagh
भुंकणारे चावत नसतात : धमकी देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना भाजप जिल्हाध्यक्षांचे उत्तर

मुंबई हे जगातील सुरक्षित शहर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यावरील झापडे कधी उघडतील. चेंबूर, नवी मुंबई, ठाणे, सांगली, अमरावती येथे महिला अत्याचारांच्या घटनांनी थैमान घातले आहे. बाललैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शासकीय यंत्रणा मात्र ढिम्म आहे. सत्तेतील तीन पक्ष रोज एकमेकांना जोड्याने हाणतात, कपडे फाडतात, आमचे ऐकले नाही तर गडबड होईल, असे फुकाचे इशारे देतात. दिवसभर एकमेकांविरोधात तावातावाने बोलणारे संध्याकाळी मात्र गळ्यात गळे घालून बसतात. आज एखादा बलात्कार झाला की, यांच्यादृष्टीने एकने आकडा वाढला एवढेच. राज्य सरकारला बाकी काहीही देणे घेणे उरलेले नाही, असा आरोपही चित्रा वाघ यांनी सरकारवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com