Ashwini Jagtap : शपथविधीपुर्वीच आमदार अश्विनी जगताप लागल्या कामाला; ...तर मी पुन्हा येईन म्हणत डॉक्टरांना इशारा

Ashwini Jagtap News : चिंचवडमधून निवडून आल्यानंतर लगेच चौथ्या दिवशी आमदार अश्विनी जगताप या आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच कामाला लागल्या आहेत.
Ashwini Jagtap News
Ashwini Jagtap NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : चिंचवडमधून निवडून आल्यानंतर लगेच चौथ्या दिवशी आमदार अश्विनी जगताप या आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच कामाला लागल्या आहेत. त्यांनी होळीच्या दिवशी (ता.६) सांगवी येथील औंध उरो पुणे जिल्हा रुग्णालयाची नुसतीच पाहणी केली नाही, तर रुग्णांना उपचाराविना परत पाठवले, तर अॅक्शन घेण्याचा इशारा तेथील डॉक्टरांना दिला.

वैद्यकीय हा सर्वसामान्यांचा निकडीचा विषय चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) आवडीचा होता. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांना त्यांनी सरळ केले होते. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या 'वायसीएम' रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीतील घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी यांनीही आपल्या पतीच्या आवडीचा विषयालाच प्राधान्य देत आपली पहिली पाहणी ही जिल्हा रुग्णालयाची केली.

Ashwini Jagtap News
Pune News : कसब्याने पुण्यातील राजकीय गणित बदलणार; खडकवासल्यात तापकीरांचे टेन्शन वाढणार...

तेथील रुग्णांना उपचार न करता परत पाठविल्याच्या तक्रारी होत्या. तसं झालं, तर मी पुन्हा येईन आणि विनाउपचार रुग्ण परत गेला, तर तुमच्यावर कारवाई करेन, असा इशारा या पाहणीदरम्यान त्यांनी तेथील डॉक्टरांना दिला. उद्याच्या धुलीवंदनानिमित्त शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे आमदारांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला आजही सुट्टी देण्यात आली. परिणामी अश्विनी जगतापांसह कसबापेठेचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांचाही आमदारकीचा शपथविधी परवा बुधवारी (ता.८) महिला दिनी होण्याची शक्यता आहे.

पण, तो होण्यापूर्वीच विजयाचा आनंद साजरा न करता तसेच सत्काराचे सोहळेही न घेता अश्विनी जगताप या कामाला लागल्याचे आज दिसून आले. औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट देत तेथील सर्व विभागांची अश्विनी जगतापांनी पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधला. त्यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला. नंतर जिल्हा शल्य चिकित्सकांसह रुग्णालयाच्या प्रशासनातील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रुग्णांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे देखील औंध रुग्णालयात रुग्णांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम आग्रही असायचे.

Ashwini Jagtap News
Bandu Jadhav : खासदार संजय जाधवांच्या मनात काय? आधी घरचा आहेर; ठाकरेंची साथ सोडणार का? आता स्पष्टच बोलले

त्यांनी तेथे आपल्या आमदार निधीतून अनेक चांगल्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या. मी सुद्धा रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जगताप यांनी या भेटीनंतर सांगितले. गरीब रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे काळाजी गरज असल्याने त्यासाठी जेनेरिक औषध केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना जिल्हा रुग्णालय प्रशासनाला यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com