Chinchwad Constituency News: चिंचवडचा उमेदवार पिंपरीत ठरणार; पण घोषणा दिल्लीत होणार

Chinchwad By-Election : दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा
BJP News
BJP NewsChinchwad

Chinchwad By-Election : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून दिवंगत जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नावे घेतली जात आहेत. त्यातील पत्नीच्या नावावर बुधवारी (दि. २५) शिक्कामोर्तब होईल, असे या पक्षातील सूत्रांनी मंगळवारी (दि. २४) `सरकारनामा`ला सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर लगेच १५ दिवसांत चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पुढील महिन्यात २७ तारखेला तेथे मतदान असून २ मार्चला निकाल आहे. या जागेसाठी भाजपकडून पहिल्यापासून दिवंगत जगतापांच्या पत्नी आणि लहान भावाचेच नाव चर्चेत आहे. फक्त त्यापैकी कोणाला तिकिट मिळणार, हा प्रश्न आहे.

BJP News
Jayant Patil : जयंत पाटील फडणवीसांना गिफ्ट देणार; पण 2024 मध्ये, काय आहे त्यांच्या मनात ?

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी (दि. २५) दुपारी एक वाजता पिंपरीतील एका तारांकिंत हॉटेलात घेणार आहेत. त्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीवरच चर्चा केली जाणार आहे. त्यावेळी या निवडणुकीत चिंचवडमध्ये कोणाला तिकिट द्यायची यावर कमिटीचे दहा सदस्य विचारविनिमय करणार आहेत. त्यावेळी अश्विनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

BJP News
Padalkar Vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर टोळी, आज ना उद्या संपणार! ; पडळकरांचा घणाघात

पतीच्या निधनानंतर पत्नीला उमेदवारी दिली, तर त्या पोटनिवडणुकीत भावनेतून विजय मिळतो, असा इतिहास आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपने या भावनेच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी चिंचवडला दिवंगत जगतापांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे नक्की केले आहे. त्याला पक्षाच्या एक नाही, तर दोन पदाधिकाऱ्यांनीच मंगळवारी दुजोरा दिला.

या बैठकीत अश्विनी जगताप यांचे नाव फायनल झाले तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवाराची काहीसी अडचण होणार आहे. कारण त्यांच्याकडून सर्व सहाही इच्छूक पुरुषच आहेत. त्यापैकी एकाला उमेदवारी मिळून पुरुष विरुद्ध महिला उमेदवार असा हा सामना होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com