Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचं लीड वाढलं..

Chinchwad Bypoll Election Result 2023 news : अश्विनी जगताप सध्या अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत.
Ashwini Jagtap - Chinchwad Bypoll Election
Ashwini Jagtap - Chinchwad Bypoll Electionsarkarnama

Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अश्विनी जगताप सध्या केवळ अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. ; चौथ्या फेरीत जगताप यांना १६,५२२, नाना काटे ९,४३५, राहुल कलाटे यांना ५,०० २ मते मिळाली आहे.

कसबा व चिंचवड या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे.चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अश्विनी जगताप सध्या अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Ashwini Jagtap - Chinchwad Bypoll Election
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.तिसऱ्या फेरीत कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

Ashwini Jagtap - Chinchwad Bypoll Election
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

चिंचवड मतदारसंघाची (Chinchwad Bypoll Election) मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com