Chinchwad By-Election : मतमोजणीआधीच कार्यकर्त्यांनी लावला 'निकाल' ; अश्विनी जगतापांचे आमदार म्हणून फ्लेक्स झळकले!

Chinchwad By-Election : प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याचा दावा...
Chinchwad By-Election :
Chinchwad By-Election :Sarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. उद्या दि. २ मार्च रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फ्लेक्स लावले गेले आहेत. उद्या निकालात जनतेचा कौल समजणार आहे. मात्र याआधीच जगताप यांचे आमदार म्हणून होर्डींग्ज लागल्याने एकच चर्चा होऊ लागली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाका येथे आणि पिंपरीच्या मुख्य चौकामध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दलचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. चिंचवड विधानसभेची निवडणूकीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Chinchwad By-Election :
BJP आता दिल्लीनंतर या राज्यातही दारु गैरव्यवहार उघड करणार ; विधानसभेसाठी नवी खेळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे दिग्गज नेते चिंचवडमध्ये निवडणुकीत जोरदार प्रचार केला. यामुळे आता निकाल कसा आणि कोणाच्या बाजूचा असेल, याचं आकलान निकाला आधीच करणे, कठीण आहे. मात्र आताच विजयाचा दावा केल्यामुळे, चर्चांना उधाण येत आहे.

Chinchwad By-Election :
Nashik News; सुहास कांदेंच्या मतदारसंघात पाच माजी आमदारांनी फुंकले रणशिंग!

दरम्यान, काही खासगी संस्थांमार्फत केलेल्या सर्व्हेमध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा करत थेट फ्लेक्सबाजीला सुरूवात केली आहे. याआधी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने, याचेदेखील निकालाआधीच फ्लेक्स लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com