Chinchwad By-Election : पंकजा मुंडेंची जादू चिंचवडमध्ये चालणार का ?

निवडणूक प्रचारात काहीही कमी पडू नये यासाठी दोन्ही मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
Chinchwad By-Election | Pankaja Munde
Chinchwad By-Election | Pankaja Munde Sarkarnama

Chinchwad By- Elelction : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 26 तारखेला मतदान होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी दोन्ही मतदार संघातील निवडणुका प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रचारात काहीही कमी पडू नये यासाठी दोन्ही मतदारसंघात भाजप आणि महाविकासआघाडीने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. कसब्यात भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे. पण चिंचवडमध्ये मात्र भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत असल्याने या निवडणुकीकडेही राज्याचे विशेष लक्ष आहे.

Chinchwad By-Election | Pankaja Munde
Pandharpur News : प्रणिती शिंंदेंनी मतदारसंघापुरते सीमित राहू नये; जिल्हाभर काम करावे : काँग्रेस नेत्याचा सल्ला

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यापासून राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळाले. यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. याचं कारणही तसंच आहे. पिंपरी आणि चिंचवड भागात मराठवाड्यातून कामानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. विशेषत: येथे ओबीसी आणि वंजारी समाजाचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पंकजा मुंडेंची मोठी छाप आहे. हाच धागा पकडून भाजपने पंकजा मुंडेंना चिंचवडमध्ये प्रचारात उतरल्याचं सांगितलं जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असली तरी नाना काटे आणि अश्विनी जगताप यांच्यातच खरा सामना होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप जवळपास 30 ते 35 हजार मतांनी विजयी झाले होते. जर पंकजा मुंडेंचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात त्यांनी ताकतीने प्रचार केला तर अश्विनी जगताप विजयी होऊ शकतात असा भाजपला विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com