Chinchwad By Election : Rahul Kalate
Chinchwad By Election : Rahul KalateSarkarnama

Chinchwad By Election : राष्ट्रवादीच्या पराभवास हातभार लावलेल्या कलाटेंचं डिपॉजिट झालं जप्त !

Chinchwad By Election : शिट्टी वाजली तर नाहीच, डिपॉजिट जप्तीची नामुष्की..

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आघाडीतील ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे (Rahul kalate) हे तेथील आघाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. मात्र, आघाडीला हा जोर का धीरे से देणाऱ्या कलाटेंनाही तो त्यांचे डिपॉजिट जप्त झाल्याने बसला आहे.

Chinchwad By Election : Rahul Kalate
Chinchwad By Election Result : विजय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊंना समर्पित; जगताप कुटुंबीय भावूक

आघाडीचे नाना काटे वगळता कलाटेंसह चिंचवड मतदारसंघातील इतर सर्व २६ उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉजिट जप्त झाले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले.त्याच्या एक षष्टांश म्हणजे १६.६ टक्के मते (४७ हजार ६६६)अनामत शाबूत राहण्यासाठी मिळणे गरजेचे होते.हा कोटा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे यांनी पूर्ण केला.त्यांना ९९,३४३ मते पडली. तर,कलाटेंसह बाकीच्या सर्व २६ उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. कलाटेंना ४४,०८२ मते मिळाली. त्यामुळे विधानसभेला सलग तीनदा पराभवाची हॅटट्रिक चाखलेल्या कलाटेंवर यावेळी डिपॉजिटही गमावण्याची पाळी आली.

गतवेळी २०१९ ला लक्ष्मण जगतापांविरुद्ध कलाटेंनी एक लाख १२ हजार मते घेतल्याने यावेळी हमखास निवडून येईल,असा दावा त्यांनी केला होता.त्या पार्श्वभूमीवर ते डिपॉजिटही वाचवू न शकल्याने त्यांच्या या दाव्याची चर्चा आता सुरु झाली आहे. आपण जनतेच्या मनातले उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले होते.या जनतेनेच त्यांचे डिपॉजिट जप्त केले.तसेच आता बंड केल्याबद्दल पक्षाकडूनही (ठाकरे गट)त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com