Chinchwad By-Election : 'चिंचवडची लढाई सहानुभूतीच्या नाही तर विकासाच्या लाटेवर : अश्विनी जगतापांची भावना!

Ashwini Jagtap : आज साहेबांची उणीव भासते..
Ashwini Jagtap  :  Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Ashwini Jagtap : Chinchwad By-Election : Laxman JagtapSarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (By Election) प्रचार शिगेला पोचला आहे. दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाची (BJP) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे, अशी चर्चा आहे. मात्र अश्विनी जगताप यांनी आम्ही या निवडणुकीकडे सहानुभूतीची लाट नाही, तर विकासाची लाट म्हणून पाहत आहोत, असे म्हंटले आहे.

अश्विनी जगताप म्हणाल्या, "जेव्हा मी सगळ्यांमध्ये जाते, मतदारांमध्ये जाते, तेव्हा साहेबांनी (दिवंगत लक्ष्मण जगताप) जे काम केलं आहे त्याची पावती मला मिळत आहे. गेल्या तीस वर्षात त्यांनी खूप कमी वेळ कुंटुंबाला दिला. मात्र पन्नास हजार लोकं जमली होती, हीच साहेबांच्या कामाची पावती होती. आज सर्व जण माझ्यासोबत भक्कमपणे उभी आहेत. आज साहेब नाहीत याचं खूप दुखं वाटतंय. आज त्यांची उणीव खूप भासते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Ashwini Jagtap  :  Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Chinchwad By Election : राहुल कलाटेंना भाजपचा छुपा पाठिंबा? महेश लांडगेंनी स्पष्टचं सांगितलं...

ते पुढे म्हणाले, "मतदारसंघात अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकर हे त्यांचे प्रमुख मुद्दे होते. तेवढ्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता. राजीनामा ही दिला. असे एकमेव आमदार होते की, त्यांनी या प्रश्नांसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आजारपणातही त्यांनी हा प्रश्न लावून धरला. शेवटी त्यांनी हे प्रश्न तडीला नेले आणि शास्तीकर व अनधिकृत बांधकामांचा प्रश्न त्यांनी पूर्णपणे सोडवला. आपलं वचन त्यांनी पूर्ण केलं, असेत्यांनी म्हंटले आहे.

Ashwini Jagtap  :  Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Chinchwad By-Election : भाजपचं टेन्शन वाढणार; महेश लांडगेंच्या ट्विटर पोलमध्ये राष्ट्रवादीच्या काटेंना पसंती

"आज मी निवडणूक म्हणून या लढाईकडे पाहतच नाही. याकडे सहानुभूतीची लाट म्हणून पाहतच नाहीये. या निवडणुकीकडे आम्ही विकासाची लाट म्हणून पाहत आहोत.जसं आम्ही एकत्र कुटुंब बांधून ठेवला आहे, तसं चिंचवड मतदारसंघ एकत्र कुटुंबासारखा राहिल, यासाठी आमचा प्रयत्न राहिल. चिंचवडला मेट्रो शहर करायचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करायचं आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कामे अपुरी राहिलेत, त्या ही पूर्ण करायचे आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा इत्यादी कामे मला चिंचवडसाठी करायची आहेत, असे अश्विनी जगताप म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com