Chinchwad By Election Result : पैसा आणि पोलिसांच्या बळावर भाजपचा चिंचवडला विजय; पराभवानंतर राष्ट्रवादीचा दावा!

Nana kate : चिंचवडला पराभव झाला, तरी जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा,शरद पवारांचा आदेश!
Chinchwad By Election Result : Sharad Pawar Nana Kate
Chinchwad By Election Result : Sharad Pawar Nana KateSarkarnama

Pimpri Chinchwad News : आघाडी आणि महायुतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेवटच्या दोन दिवसांपर्यत महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होते. मात्र,शेवटच्या क्षणी पैसा आणि पोलिसांच्या बळावर ते फिरविण्यात आल्याने पराभव झाला, असा दावा आघाडीतील राष्ट्रवादीचे चिंचवडमधील उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी आज `सरकारनामा`शी बोलताना केला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यातील मोदी बागेत भेट घेतल्यानंतर काटे `सरकारनामा `च्या प्रतिनिधीशी बोलत होते. पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे त्यांच्याबरोबर होते. त्यांच्याकडून चिंचवडच्या पराभवाची पवारांनी प्रभागनिहाय माहिती घेतली.कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केले, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कोठे कमी पडलो, यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांचा तपशील घेतला, असे काटे म्हणाले.

Chinchwad By Election Result : Sharad Pawar Nana Kate
Rasane On Dhangekar : "रवीभाऊ, बोलताना भान ठेवा, आपण इतके मोठे नाही की..." ; रासनेंनी धंगेकरांना सुनावलं!

झालेल्या चुका सुधारू आणि त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर लवकरच भेटू, आगामी निवडणुकीसाठी नव्याने नियोजन करू, असा धीर त्यांनी दिला. चिंचवडला मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्याला साठी संधी असताना त्याचे विजयात रुपांतर झाले नसले, तरी खचून न जाता या निवडणुकीपेक्षाही अधिक जोमाने पुढील निवडणुकीच्या तयारी लागा, असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवडला झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून, येणार्‍या महापालिका निवडणुकींच्या तयारीलाअधिक जोमाने आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Chinchwad By Election Result : Sharad Pawar Nana Kate
Chinchwad : अजित पवार - राहुल कलाटे - नाना काटे रात्री दोन वाजेपर्यंत एकत्र बसले : मार्ग का निघाला नाही?

चिंचवडमधील पराभवाची कारणे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या भेटीत पवारांकडे विशद केली.राहूल कलाटेंच्या बंडाचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचा चिंचवडला झालेला विजय हा त्यांचा नैतिक पराभव आहे. कारण त्यांच्या आमदारांच्या तेथील मृत्यूनंतर सुद्धा त्यांना सहानुभूती मिळाली नाही, असे सांगत गतवेळपेक्षा दहा हजाराने अधिक मतदान यावेळी होऊनही, त्यांना १५ हजार कमी मते मिळाली. मताधिक्यही सव्वा दोन हजारांनी घटले, याकडे अजित गव्हाणेंनी या भेटीनंतर सरकारनामाशी बोलताना लक्ष वेधले.

चिंचवडचा भाजपचा विजय नैतिकही नसल्याचे सुनील गव्हाणे म्हणाले. तर,पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या मोठ्या भ्रष्टाचारामुळे जनमानसांत त्यांच्याबद्दल मोठी नाराजी, तर मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत राष्ट्रवादीविषयी अनुकूल वातावरण होते.त्यात सहानुभूतीच्या लाटेचाही फायदा मिळणार नसल्याचे लक्षात येताच सत्ताधारी भाजपने पैसे वाटले, पोलिसी बळाच वापर केला, आमच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखले,काहींना,तर पोलिस कोठडीत डांबले,दडपशाही केली, ही बाब काटेंनी आपल्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in