Chinchwad By-Election : अजितदादा निर्णय घेणार असल्याने `चिंचवड`मधील राष्ट्रवादी इच्छुकांच्या आशा पल्लवित

आमदारांच्या अकाली निधनामुळे होऊ घातलेल्या या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध न होण्याचे संकेत वाढले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Chinchwad By-Elections : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य न करता त्याबाबत अजित पवार यांनाच विचारा या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कालच्या वक्तव्यातून ही जबाबदारी अजितदादांकडे देण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे `चिंचवड`मधील राष्ट्रवादीच्या इच्छूकांच्या आशा आता ही निवडणूक होण्याच्या शक्यतेने पल्लवित झाल्या आहेत. कारण ती लढण्याचे सुतोवाच अजितदादांनी अगोदरच केले होते.

कसब्याची जागा कॉंग्रेस,तर चिंचवडची राष्ट्रवादी अशी तडजोड महाविकास आघाडीत जागावाटपात होण्याची शक्यता उद्योगनगरीतील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आज व्यक्त केली. त्यामुळे आमदारांच्या अकाली निधनामुळे होऊ घातलेल्या या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध न होण्याचे संकेत वाढले आहेत.

Ajit Pawar
Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपला गडाला सुरुंग; डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात प्रवेश करणार?

तसेच चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळण्याचे आता जवळपास नक्की झाले आहे.मात्र,त्यानंतर आता उमेदवारीचा पेच राष्ट्रवादीसमोर उभा राहणार आहे. कारण या एका जागेसाठी सहा तालेवार उमेदवार तीव्र इच्छूक आहेत. त्यातील दोघांनी,तर सोशल मिडीयातून आपला अप्रत्यक्ष प्रचारही सुरु केला आहे. त्यामुळे हा पेच अजितदादांना आपल्या पद्धतीने कसा मिटवितात,याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, शहरात एकही नगरसेवक नसलेल्या कॉंग्रेसने `चिंचवड`च्या जागेवर दावा केल्याने त्याची शहरात खमंग चर्चा आहे. पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला २०१७ ला निर्णायक घरघर लागली.त्यांचे बहूतांश नगरसेवक, आमदार हे भाजपमध्ये गेल्याने प्रथमच पालिकेत भाजप सत्तेत आला. दुसरीकडे कॉंग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले आणि कॉंग्रेसही शहरात नगरसेवकांच्या बाबतीत शून्य झाली. त्यात त्यांचे दोन गट पडले.

Ajit Pawar
Bhagatsingh Koshyari : राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारीत; पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

अशास्थितीत त्यांच्या भाजपविरुद्ध चिंचवडला उमेदवारी देण्याच्या दाव्याची व त्यासाठी सहाजण इच्छूक असल्याचे सांगणाऱ्या शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या विधानाची खिल्ली उडवली जात आहे. प्रथम पालिकेत खाते उघडा आणि मग आमदारकीचे स्वप्न पहा,असे टोमणे त्यांना विरोधकांकडून मारले जात आहेत. त्यांच्या या क्लेमवर बोलताना राष्ट्रवादीकडून चिंचवडला इच्छूक असल्याचे जाहीर करीत सोशल मिडीय़ातून प्रचारही सुरु केलेले नाना काटे यांनी चिंचवडमधून राष्ट्रवादीलाच शंभर टक्के उमेदवारी मिळणार आहे,असे सांगितले. याबाबतचा निर्णय आघाडीच्या नेते घेणार असून तो सर्वांना येथे मान्य करावा लागणार आहे,असे ते म्हणाले.

कॉंग्रेसप्रमाणे शिवसेनेनेही चिंचवड लढण्याच्या केलेल्या घोषणेची खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळाली.शिवसेना आता दुभंगली आहे. शहरात फक्त त्यांचे १२८ मध्ये ९ नगरसेवक होते. त्यातील एकाने,तर अगोदरच पक्षाला जय महाराष्ट्र करीत कमळ हाती घेतलेले आहे. फुटलेल्या शिवसेनेकडे शहरात खासदार,माजी खासदार आहेत.त्यामुळे चिंचवड लढण्याचा शहर ठाकरे शिवसेनेने केलेल्या ठरावाची व त्यासाठी पाच इच्छूक असल्याचे सांगणाऱ्या शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले यांच्या वक्तव्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर टर उडविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com