Chinchwad By-Election : चिंचवडमध्ये १४ लाख रूपयांची रोकड जप्त, मतदानाच्या पार्श्वभूमीवर खळबळ !

Chinchwad By-Election : य़ापूर्वीही चिंचवडमध्ये ४३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती.
Chinchwad By-Election :
Chinchwad By-Election :Sarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान आज चिंचवडमध्ये १४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चिंचवडच्या दळवीनगरमध्ये ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. यामुळे जप्त केलेल्या या पैशांबाबत आता शहरात सगळीकडे चर्चा सुरू आहे.

Chinchwad By-Election :
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर जाणार, विरोधकांची मोट बांधणार?

यात विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणाहून ही १४ लाखांची रक्कम जप्त करण्यात आाली होती, त्याच चिंचवडच्या दळवीनगर भागातून काही दिवसांपूर्वी ४३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती. एकाच ठिकाणाहून दोन वेळा मोठी रक्कम जप्त करण्यात आल्याने आता याबाबत मतदारसंघात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Chinchwad By-Election :
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर जाणार, विरोधकांची मोट बांधणार?

चिंचवड मतदारसंघातील निवडणूक पथकाने एका कारमधून ही १४ लाख रुपयांचे रोकड जप्त केले आहे. यापूर्वी निवडणूक पथकाने ४३ लाख रूपयांची रोकड याच ठिकाणाहून जप्त केली होती. यामुळे आता निवडणुकीत आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर पैसांचा सर्रास वापर केला जातोय का? असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com