Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणुकीत 'आप'ची उडी ; बिनविरोध होण्याच्या शक्यता मावळल्या?

Chinchwad By Election : पूर्ण ताकदीनिशी आप निवडणुकीत उतरणार!
Chinchwad Chetan Bendre
Chinchwad Chetan Bendre Sarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असतानाच, यामध्ये आता वेगळे ट्विस्ट येत आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक बिनविरोध होण्याबाबत शंका उपस्थित केली होती. आज आम आदमी पक्षाने या निवडणुकीत उडी घेतली आहे. यामुळे आता बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता जवळ-जवळ मावळली आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्ष पूर्ण ताकद लावूव उतरणार असे 'आप'चे पदाधिकारी चेतन बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. बेंद्रे म्हणाले की, "मागील दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सर्वांची अशी इच्छा आहे की, चिंचवड विधानसभा आपने लढवली पाहिजे." बेंद्रेंनी दिलेल्या या माहितीनंतर आता पोटनिवडणुकीची लढत तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.

Chinchwad Chetan Bendre
Politics : पार्थ पवार - शंभूराज देसाईंच्या भेटीचे कारण काय? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..

दरम्यान, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी ही निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत दिले होते. पवार म्हणाले, 'चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. या मतदारसंघातल्या बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही पोटनिवडणूकलढवावी, असा आग्रह धरला आहे. त्यांच्या आग्रहाखातरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.' असे पवार यांनी नुकतेच पुण्यात बोलले होते.

Chinchwad Chetan Bendre
Politics : 'चिंचवड' लढायचे की नाही हे राष्ट्रवादीचे दोन दिवसांत ठरणार; तर भाजपचा उमेदवारच...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर आता आपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उडी घेतल्याने, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता जवळ-जवळ मावळले आहे. तरीही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार की राष्ट्रवादी, आपसोबतच इतरही छोटे मोठे पक्ष आणि अपक्षांची भर पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in