Chinchwad By-Election : चिंचवडमध्ये नवा टि्वस्ट : जगताप कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तिचा भाजपच्या उमेदवारीवर दावा!

Chinchwad By-Election : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीचा सस्पेंस कायम!
Chinchwad By-Election
Chinchwad By-ElectionSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजपकडून दिवंगत आमदार जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि त्यांचे बंधू शंकर जगताप यांचीच नावे आतापर्यंत उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.भावनेच्या लाटेचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांच्यापैकीच एकाला उमेदवारी मिळेल,अशी दाट शक्यता आहे. मात्र,आता त्यात आज नवा ट्विस्ट आला. कारण आता जगताप कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीनेही भाजपच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे.

चिंचवड मतदारसंघातीलच भाजपचे नगरसेवक (प्रभाग २८ ड, काळेवाडी-रहाटणी) चंद्रकांत नखाते यांनी `चिंचवड`साठी इच्छुक असल्याचे `सरकारनामा`ला आज सांगितले. त्यामुळे याअगोदर या ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी जसा दावा केला आहे, तसा आता भाजपमध्येही प्रथमच एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक दिसून आले आहेत.

Chinchwad By-Election
Dombivali News : "साहेब, मी गद्दार नाही..." शिवसेनेच्या 'त्या' बॅनरची शहरभर एकच चर्चा!

उमेदवारी मिळण्यासाठी नखाते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अशा वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत.त्यावर त्यांना विचार करू, असे आश्वासन मिळाले आहे. तीनवेळा नगरसेवक राहिल्याने प्रभागाचा कायापालट केला असल्याचा दावा नखाते यांनी केला आहे. आता शहरासाठी काम करायचे असल्याने आमदारकीसाठी दावा त्यांनी केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, पक्षाचा निर्णय अंतिम असून ते जो कोण उमेदवार देतील, त्याचं काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना नुकतेच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता पक्ष त्यांना पुढची बढती म्हणून, आमदारकीचे तिकिट देईल का? याकडे चिंचवडचे लक्ष लागले आहे.

Chinchwad By-Election
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

चिंचवडमधील भाजपच्या उमेदवारीचा निर्णय आणि घोषणा ही दिल्लीत होणार असून, त्यासाठी तीन नावे पाठविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात सांगितले. तत्पूर्वी त्यासाठी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी ते परवा (ता.२५) चर्चा करणार आहेत. त्यावेळीच चिंचवडमधून भाजपचा उमेदवार नक्की होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in