अजितदादांनी आडकाठी आणली तर माझ्याकडे या; आपण पवारसाहेबांकडे जाऊ!

आमचे बंधू आज लयच जोरात होते.
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama

बारामती : अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनोव्हेशन सेंटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. २) एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेपुढे येणा-या अडचणींची माहिती दिली. कृषी खाजगी विद्यापीठास आणि खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी द्यावी. अनेक चुकीचे निर्णय बदलण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली तसेच लालफितीचा कारभारही कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या परखड शैलीत त्यांनी अनेक बाबी स्पष्टपणे मांडल्या.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार; कलाबेन डेलकर विजयी

हाच धागा पकडून अजित पवार गंमतीने आपल्या भाषणात म्हणाले, आमचे बंधू आज लयच जोरात होते. साहेब, मी आणि मुख्यमंत्री इथे बसलेत पण बाबा थांबायलाच तयार नव्हते. काम करुन घ्यायचे असेल तर त्याला पार उभ आडव करुन काम कस होणार, गोड बोलून कुठतरी एखादा चिमटा काढून करुन घ्यायचा. मात्र, सारखे इकडे चिमटे तिकडे चिमटे काढून नाही. ते आमचे मोठे बंधू पडतात त्या मुळे जास्त काही बोलत नाही, अशी पुस्तीही गंमतीने त्यांनी जोडली व हात जोडून जी काही नोंद घ्यायची आहे बंधूराज...ती घेतलेली आहे. इतकच सांगतो असे म्हटल्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. पवार कुटुंबियांची आज ठाकरेंची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

यावर मुख्यमंत्री बोलले नसते तरच नवलच होते. मुख्यमंत्र्यांनीही याचा उल्लेख केला, ते म्हणाले, दादा आपण आपल्या बंधूंच्या मनोगतबाबत बोललात आता तुम्ही दोघ ठरवा आणि मला सांगा. काय काय करायचे आणि दादांनी आडकाठी आणली तर तुम्ही माझ्याकडे या म्हणजे आपण दोघे पवारसाहेबांकडे जाऊन ते करुन घेऊ, असे म्हटल्यावर सभागृहात पुन्हा एका जोरदार हास्यकल्लोळ झाला. चांगल्या कामाला कधीच आड येणार नाही, लाल फिती असतील तर आपण कात्रीचे सेंटर काढू, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी राजेंद्र पवार यांना आश्वासन दिले. महाराष्ट्र जगात सर्वोत्तम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच असेही ते म्हणाले. दिवाळी सुरु झाली आहे, काही काही जण म्हणतात बॉंब फुटणार आहे, ठिक आहे. आवाज येऊ द्या पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेलेला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
आम्ही सुद्धा २५ वर्ष नको ती अंडी उबवली, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

आम्हीही इनक्युबेशन सेंटर उभारले होते...

राजकारणात टीकाकार असतात ते असलेच पाहिजेत, थोडा पॉज घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, आम्हीही इतक्या वर्षे होतोच तुमचे टीकाकार राज्याच्या राजकारणात शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वांनाच माहिती होती. ते असताना मला नेहमी म्हणायचे आपण बारामतीला जाऊन शरदबाबू काय करत आहेत ते पाहायला पाहिजे. राजकारणात पटत नसले तरी चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. अगदी पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्न तरी आणू नये, विघ्नसंतोषी लोक खूप असतात त्यांना कामती आनंद कधीच समजत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com