नाना पाटेकरांच्या घरी मुख्यमंत्री शिंदे रमले तब्बल दीड तास; जेवण अन् रंगली गप्पांची मैफिल

Nana Patekar : नानांच्या फार्म हाऊसवर दिलेला इतका वेळ मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Nana Patekar, Eknath Shinde Latest News
Nana Patekar, Eknath Shinde Latest News Sarkarnama

पुणे : पुण्यातील मानाचे आणि काही प्रमुख गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. ७ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आले होते. गणेशोत्सवामुळे आधीत भाविकांची झालेली गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यात पावसाने अजूनच भर पडली परिणामी मुख्यमंत्री शिंदेंचा (Eknath shinde) दौरा चर्चेत आला. मात्र या दौऱ्यामुळे पुणेकरांचे पुरते हाल झाले.

दरम्यान, या धामधूमीतून मुख्यमंत्री शिंदेंनी वेळ काढत आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या घरी भेट दिली. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, पाटेकर कुटुंबातील प्रमुख सदस्य आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी जेवण केलं, नाना यांच्या बागेत वृक्षारोपण आणि नानांशी मनसोक्त गप्पाही मारल्या, इतक सार काम असतांना मुख्यमंत्री शिंदेनी नानांच्या घरी इतका वेळ घालवल्याने जोरदार चर्चा होत आहे. (Nana Patekar, Eknath Shinde Latest News)

Nana Patekar, Eknath Shinde Latest News
सिब्बलांनी एक युक्तिवाद केला अन् ठाकरेंना दिलासा मिळाला...

आज मुख्यमंत्री शिंदे हे पुण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने त्यांचा दौरा हा वाहनचालकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरला. मुख्यमंत्री येणार म्हणून सकाळी अकरापासूनच बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता काही ठिकाणी बंद करण्यात आला होता. बंद रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळविण्यात आल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडला. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूक कोंडी होती. शिंदे हे दुपारी एक वाजताच्या सुमारास पुण्यात दाखल झाले. यानंतर त्यांनी पुण्यातील सर्व मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. भाऊसाहेब रंगारी गणेशमंडळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सिंहगड परिसरात आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Nana Patekar, Eknath Shinde Latest News
राष्ट्रवादीच्या डॉ. अंबिकेंनी लक्ष्मण भाऊंच्या प्रेमापोटी भाजपमध्ये केला प्रवेश

या धामधूमीतून मुख्यमंत्री शिंदे हे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोंणजे येथीस फार्म हाऊसवर गेले. तिथे त्यांनी जेवणं केलं, नानांच्या बागेत वृक्षारोपणं केलं आणि नानांशी मनसोक्त गप्पा केल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे अन् नानांच्या परिवारातील सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी शिंदेंचे काम सुरूच होते. ते सारखे अधिकारी आपले सहकारी यांच्यासोबत फोनवरून चर्चाही करतांना दिसत होते. त्यांनी वेळात वेळ काढत नानांच्या फार्म हाऊसवर दिलेला इतका वेळ मात्र चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com