मुख्यमंत्री शिंदेंनी कुटुंबासह मंचरला घेतला 'डिनर डिप्लोमसी'चा आनंद; होतेय जोरदार चर्चा

Eknath Shinde : वळसे पाटील,आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांकडे नाश्ता घेऊन त्यांना खुश केले.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Sarkarnama

मंचर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आंबेगाव तालुक्याचा दौरा संपूर्ण राज्यात चर्चेत आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) या दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन नाष्टा घेतला. दोघांनाही खुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण भीमाशंकर दर्शन घेतल्यानंतर माघारी आल्यानंतर मात्र शनिवारी (ता.२० ऑगस्ट) रात्री दहाच्या सुमारास मंचर जवळच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी कुटुंबासह जेवणाचा आस्वाद घेतला. राजकीय घोंगाटापासून थोडा वेळ अलिप्त राहून त्यांनी कुटुंबाला वेळ दिला.(Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Latest News
गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना फटकारल्याचे ठाकरेंकडून कौतुक; म्हणाले,तो कोण होता...

रविवारी (ता.२१ ऑगस्ट) पूर्व नियोजित वेळेनुसार लांडेवाडी येथे शिंदे दुपारी तीन वाजता येणार होते. पण ठाणे येथून निघण्यास त्यांना विलंब झाला. चाकण जवळ भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांच्याही शिष्टमंडळाबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर नियोजित कार्यक्रमात नसतानाही मंचर येथे वळसे पाटील यांची संध्याकाळी निवासस्थानी भेट घेऊन तेथे थालीपीठ, खिचडी, शिरा, रव्याचे लाडू, फळे व ड्रायफूड्सचा आस्वाद चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी पाहुणचार स्वीकारून ते मंचर मार्गे लांडेवाडीत गेले.

आढळराव यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांच्या धर्मपत्नी कल्पना आढळराव पाटील यांनी तयार केलेले गरम भजी, साबुदाणा वडे, ढेपले, शिरा या पदार्थांचा आस्वाद घेतला. तेथे नागरिकांचे निवेदने व शुभेच्छा स्वीकारून आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे, तालुका प्रमुख अरुण गिरे यांच्या समवेत ते थेट श्री क्षेत्र भीमाशंकरला गेले. माघारी जाताना ते थेट मुंबईकडे रवाना होतील. अशी अपेक्षा होती. मंचरपर्यंत ताफा आल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्याऐवजी मंचरच्या उत्तर बाजूला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये ते आले.

Eknath Shinde Latest News
आमदार शेळकेंना एसपींचा फोन आला म्हणून आज पुणे-मुंबई हायवे ठप्प झाला नाही; अन्यथा...

त्यांचे कौटुंबिक, मित्र नगरसेवक विकास रेपाळे (मुळगाव वडगाव कांदळी ता.जुन्नर) यांनी तेथे भोजनाची व्यवस्था केली होती. शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, सुन वृषाली व नातू यांच्या समवेत आनंदाने आळूची वाडी, मेथी, कारल, वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, चपाती, मिरचीचा ठेचा अश्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हॉटेलचे मालकाने मुख्यमंत्र्यांचा सन्मान करून निवांतपणे फोटो काढण्याची संधी साधली.

दरम्यान, वळसे पाटील व आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांकडे नाश्ता घेऊन त्यांना खुश केले पण जेवण मात्र निवांतपणे एकांतात कौटुंबिक वातावरण घेणे त्यांनी पसंत केले. मात्र त्यांच्या या 'डिनर डिप्लोमसी'ची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in