Eknath Shinde : अमित शाह जास्त बोलत नाहीत, पण फटक्यात काम करुन टाकतात; मुख्यमंत्री शिंदेंनी केले कौतुक

Amit Shah News : सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Eknath Shinde News : महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने देखील सहकार क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. साखर उद्योग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या चर्चेतून काहीतरी चांगले घडले, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी शिंदे यांनी 'सकाळ' माध्यम समुहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री शिंदे 'सकळ' माध्यम समूहाच्यावतीने आयोजित 'बँकींग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदे'मध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक, संचालक श्रीराम पवार उपस्थित होते. सकाळ माध्यमसमूह शतकाकडे वाटचाल करत आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून सकाळने समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. कोरोना काळातही सकाळने मोठ्या प्रमाणात काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde News
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे गुरुजी खुशीत

या वेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''या सहकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होईल. सहकार चळवळ आणि महाराष्ट्र हे नाते जवळचे आहे. हे नाते विकास घडवणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सहकार वाढला रुजला. सहकारामुळे महाराष्ट्र वाढला आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे नवीन गाव उभी राहिली त्यांचा विकस मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळाला. त्यांच्या हाताला काम मिळाले. महाराष्ट्रात एकून दोन लाख २० हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील पाच ते सव्वा पाच कोटी जणता सहकारावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे अवलंबून आहे.''

''आम्ही अमित शाह यांच्याकडे दिल्लीला गेलो. तेव्हा त्यांना सहकारासाठी काय करायचे हे सगळे माहित होते. त्यांनी आम्हाला आश्वास दिला. ते जास्त बोलत नाहीत, पण फटक्यात काम करुन टाकतात. त्यांनी मोठा निर्णय घेतला. १० हजार कोटींचा टॅक्स माफ केला. ते ऑपरेशन करतात तेव्हा कळतही नाही, केव्हा करतात आणि केव्हा संपते. त्यांनी ३७० चा विशय मिटवला, इतक्या वर्षाचा विषय त्यांनी मिटवून टाकला.''

''सहकार आपल्याकडे आहे, त्यामुळे आपल्याकडून महाराष्ट्राला आणि आम्हाला खूप आशा आहेत. त्यांनी सहकारामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. हे क्षेत्र विकासाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमाकांवर आहे. निर्यातीवर लक्ष द्याल, अशी आशा आहे. अनेक निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सरकार काम करत आहे. सहकार खात्याला आपल्या संयोगाची गरज आहे.''

Eknath Shinde News
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

''राज्य सरकार आपल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आपले मोठे योगदान आहे. आम्ही राज्याचा सर्वांगीन विकास करत आहोत. भूविकास बँकचे कर्ज माफ केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. अनेक संकटांमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली आहे.''

''जे शेतकरी नियमीत कर्ज फेडतात, त्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. एका दिवसात सहा लाख शेकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी काम करणार आहे. या क्षेत्रात आपल्या नेतृत्वाखाली क्रांती होईल. सामान्य माणसाला केंद्रबिंदू माणून आम्ही काम करत आहोत. केंद्रीय बजेटमध्ये मोठा निधी दिला. १५ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुंबईत आले होते. आम्ही आपल्या सोबत आहोत. तुम्ही जे सांगितले होते, त्यापेक्षा अधिक देत आहात,'' असेही शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com